Bank Holidays : मार्च महिन्यात 'एवढ्या' दिवस बँका राहणार बंद; पाहा सुट्ट्यांची यादी

मार्चमध्ये बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वपूर्ण काम करायचे असेल तर अगोदर बँकांच्या सुट्ट्यांची यादी पहा.
Bank Holidays
Bank Holidays Sakal

Bank Holidays in March 2023 : 2023 वर्षाचा दुसरा महिना संपणार आहे आणि मार्च सुरू होणार आहे. मार्च महिन्यात बँका सुट्ट्यांनी भरल्या आहेत कारण मार्चमध्ये अनेक सण उत्सव आहेत.

त्यामुळे मार्चमध्ये बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वपूर्ण काम करायचे असेल तर अगोदर बँकांच्या सुट्ट्यांची यादी पहा.

रिझर्व बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) जाहीर केलेल्या यादीनुसार मार्च 2023 मध्ये एकूण 12 दिवस सुट्या आहेत.

होळीसह अनेक उत्सवांमुळे बँका बंद :

होळी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळी व्यतिरिक्त चैत्र नवरात्र, तेलगू न्यू इयर, गुडी पडवा, रामनवमी सारखे अनेक सण या महिन्यात साजरे केले जातात.

Bank Holidays
Chemical Company Layoffs : केमिकल कंपनीचा मोठा निर्णय; आता 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना देणार नारळ

आरबीआय राज्यांनुसार सुट्टीची यादी जाहीर करते. या व्यतिरिक्त, महिन्यात शनिवारी आणि रविवारी बँका बंद असणार आहेत.

या दिवशी बँका राहतील बँका -

 • मार्च 03, 2023 - चापचर कूटच्या निमित्ताने सुट्टी

 • मार्च 05, 2023 - रविवारची सुट्टी

 • मार्च 07, 2023 - होळी सुट्टी

 • मार्च 08, 2023 - लेटी, डोल जात्रा, होळी सुट्टी

 • मार्च 09, 2023 - होळी पाटणा सुट्टी

 • 11 मार्च, 2023 - दुसरा शनिवारची सुट्टी

 • मार्च 12, 2023 - रविवारीची सुट्टी

 • मार्च 19, 2023 - रविवारची सुट्टी

 • 22 मार्च, 2023 - गुडी पडवा/ उगडी/ बिहार दिन/ प्रथम नवरात्र/ तेलगू नवीन वर्ष

 • 25 मार्च, 2023 - चौथा शनिवार सुट्टी

 • 26 मार्च, 2023 - रविवारची सुट्टी

 • 30 मार्च, 2023 - राम नवमीच्या निमित्ताने सुट्टी

Bank Holidays
जाणून घ्या काॅन्ट्रा फंडातल्या गुंतवणुकीबाबत

बँकांना सुट्ट्या असल्या तरी ग्राहक एटीएम वापरू शकता. या व्यतिरिक्त, एका खात्यातून दुसर्‍या खात्यात पैसे हस्तांतरित करण्यासाठी मोबाइल बँकिंग किंवा नेट बँकिंग वापरू शकता. तसेच यूपीआयद्वारे एका खात्यातून दुसर्‍या खात्यात सहजपणे पैसे हस्तांतरित करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com