Equitas Small Finance Bank : 100 रुपयांपेक्षा स्वस्त बँकेचा शेअर देईल तगडा परतावा, कोणता आहे हा शेअर ?

इक्विटास स्‍मॉल फायनान्स बँक (Equitas Small Finance Bank) सध्या चांगले परफॉर्म करत आहे. गेल्या एका वर्षात जवळपास या शेअर्सने 40 टक्के परतावा दिला आहे.
Equitas Small Finance Bank
Equitas Small Finance Bank Sakal

Equitas Small Finance Bank : इक्विटास स्‍मॉल फायनान्स बँक (Equitas Small Finance Bank) सध्या चांगले परफॉर्म करत आहे. गेल्या एका वर्षात जवळपास या शेअर्सने 40 टक्के परतावा दिला आहे. अँटीक ब्रोकींगने या शेअरचे रेटिंग 'होल्ड' वरून 'बाय' वर अपग्रेड केले आहे.

शेअरसाठीचे टारगेट प्रति शेअर 120 रुपये निश्चित करण्यात आले आहे. सध्या हा शेअर 99 रुपयांवर ट्रेड करत आहे. म्हणजेच स्टॉकमध्ये आता गुंतवणूक केल्यास सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 22 टक्के मजबूत परतावा मिळू शकतो.

गेल्या काही महिन्यांतील बाजारातील करेक्शनमुळे हा शेअर आपल्या रेकॉर्डब्रेक किंमतीवरुन खाली गेला आहे. सध्या हा स्टॉक त्याच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून सुमारे 15 टक्के सवलतीवर ट्रेड करत आहे. 12 जानेवारी 2024 रोजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक 116.50 रुपये गाठला होता.

मार्च तिमाहीत बँकेने 210 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला, जो अंदाजानुसार होता असे अँटिकचे म्हणणे आहे . वार्षिक आधारावर नफा 9 टक्क्यांनी वाढला आहे. निव्वळ व्याज मार्जिन (NIM) 20 bps (QoQ) ने 8.2 टक्क्यांवर आले. एयूएम ग्रोथ 23% (YoY) होती. डिपॉजिट ग्रोथदेखील 12% (QoQ) आणि 42% (YoY) आहे.

एसेट क्‍वॉलिटी देखील स्‍टेबल आहे. मार्जिनमधील घट मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली आहे. इथून लोन आणि डिपॉझिट ग्रोथला वेग आला आहे. गेल्या तीन तिमाहीत स्टॉकची कामगिरी कमी झाल्याचे ब्रोकरेजचे म्हणणे आहे. पॉझिटीव्ह आऊटलूकमुळे स्टॉकचे रेटिंग अपग्रेड केले गेले आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com