Richest Person : तीनच दिवसांमध्ये तीन वेळा बदलले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; मस्क आणि बेझोस दोघांनाही 'या' व्यक्तीने टाकलं मागे..

Billionaire index : लुई व्हिटॉन आणि अशाच कित्येक लग्झरी ब्रँड्सचे मालक असणारे बर्नार्ड अरनॉल्ट हे आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
World's Richest Person
World's Richest PersoneSakal

World's Richest Person : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? या प्रश्नाचं उत्तर गेल्या तीन दिवसांमध्ये तीन वेळा बदललं आहे. तीन दिवसांपूर्वी टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यानंतर बुधवारी हा ताज अमेझॉनच्या जेफ बेझोस यांनी हिसकावला होता. आता या दोघांनाही मागे टाकत फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्ट (Bernard Arnault) हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.

लुई व्हिटॉन आणि अशाच कित्येक लग्झरी ब्रँड्सचे मालक असणारे बर्नार्ड अरनॉल्ट हे आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार आता त्यांची नेट वर्थ (Bernard Arnault Net Worth) 197 बिलियन डॉलर्स एवढी झाली आहे. एबीपीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

मस्क-बेझोस किती मागे?

अमेझॉनचे मालक जेफ बेझोस (Jeff Bezos Net Worth) आता या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. त्यांची नेट वर्थ ही 196 बिलियन डॉलर्स एवढी झाली आहे. तर इलॉन मस्क (Elon Musk Net Worth) हे या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांची नेट वर्थ 189 बिलियन डॉलर्स एवढी झाली आहे.

World's Richest Person
Starlink Satellite Crash : इलॉन मस्क पृथ्वीवर पाडणार तब्बल 100 उपग्रह; वातावरणावर काय होणार परिणाम?

फोर्ब्सच्या यादीत वेगळं चित्र

ब्लूमबर्गच्या यादीनुसार गेल्या कित्येक वर्षांमध्ये पहिल्यांदाच टॉप 3 श्रीमंत व्यक्तींमध्ये एकाचीही नेट वर्थ 200 बिलियन डॉलर्स नाहीये. मात्र, फोर्ब्सची रिअलटाईम (Forbes Realtime billionaire index) आकडेवारी वेगळंच चित्र दाखवत आहे. यामध्ये पहिल्या स्थानावर असणाऱ्या बर्नार्ड यांची नेट वर्थ 227.6 बिलियन डॉलर्स एवढी आहे. या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर इलॉन मस्क आहे, ज्यांची नेट वर्थ 195.8 बिलियन डॉलर्स आहे. तर तिसऱ्या स्थानावर 194.6 बिलियन डॉलर्स नेट वर्थसह जेफ बेझोस आहेत. एकूणच, पहिल्या तीन श्रीमंतांच्या यादीमध्ये या तिघांमध्ये सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com