Adani Ports: अदानींचा पाय आणखी खोलात? हिंडेनबर्गच्या आरोपावर ऑडिटरचा मोठा खुलासा

Adani Ports
Adani Ports

गौतम अदानी यांना पुन्हा एकदा नवीन संकटाचा सामना करावा लागू शकतो. त्यांच्या विविध क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या समस्या संपत नाही की दुसरी समस्या सुरू होते. हिंडेनबर्गच्या आरोपानंतर सेबीच्या चौकशीला सामोरे जाणाऱ्या अदानी समूहाला आता नवा धक्का बसला आहे. अदानी समूहाची कंपनी असलेल्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनला मोठा झटका बसला आहे.

अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) यां कंपनीवर त्यांच्या ऑडिटर कंपनीलात विश्वास नाही आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनने त्यांची ऑडिटर कंपनी Deloitte Haskins & Sells LLP ला तीन व्यवहारांची संपूर्ण माहिती दिलेली नाही.

एका अहवालानुसार, Deloitte Haskins & Sells LLP ने मंगळवारी अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या तीन संस्थांसोबतच्या व्यवहारांबद्दल चिंता व्यक्त केली. तर अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन देखील यावर स्पष्टीकरण दिले आहेत. त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. तीन संस्थांसोबतच्या व्यवहाराशी संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मात्र ऑडिटरांचे म्हणणे आहे की ते अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेऊ शकत नाहीत. तसेच त्या तीन संस्थांसोबतच्या व्यवहारांचा सबंध आहे की नाही, याची पुष्टी ते करु शकत नाहीत.

Deloitte Haskins & Sells LLP कंपनीने म्हटले आहे की, त्यांच्या मूल्यांकनात ऑडिट उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी पुरेशी माहिती नव्हती. याचा अर्थ अदानी पोर्ट्स स्थानिक कायद्यांचे पूर्णपणे पालन करत आहे की नाही यावर भाष्य करणे कठीण आहे.

Adani Ports
Share Market Closing: चार दिवसांच्या तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 400 अंकांनी घसरला, बँकिंग शेअर्समध्ये

तीन व्यवहार कोणते?

  • अदानी समूहाने हिंडेनबर्ग अहवालात उघड झालेल्या कंपनीच्या उपकंपनीसोबत अभियांत्रिकी करारावर स्वाक्षरी केली. जिच्याकडून ३१ मार्चपर्यंत ३७.५ अब्ज रुपये वसूल करण्यायोग्य होते.

  • शॉर्ट सेलर अहवालात काही कंपन्या दिसून आल्या ज्यांच्यामध्ये इक्विटीसह आर्थिक व्यवहार झाले आहेत. मात्र अदानी समूहाने डेलॉइटला सांगितले की हे कंपनीशी संबंधित नाहीत. कोणतीही देय रक्कम शिल्लक नसनू सर्व देयांचा निपटारा करण्यात आला आहे.

  • अदानी पोर्ट्सने म्यानमार बंदराची विक्री या महिन्याच्या सुरुवातीला अँगुइला येथे स्थापन केलेल्या सोलर एनर्जी लिमिटेडला केली. विक्री किंमत २०.१५ अब्ज रुपयांवरून केवळ २.४७ अब्ज रुपयांवर सुधारित करण्यात आली. हे देखील कंपनीशी संबंधित नसल्याचे अदानी समुहाने म्हटले आहे.

Adani Ports
Fixed Deposit : मुदत ठेवींचे व्याजदर वाढले; ही बँक देतेय ९.११ टक्के व्याज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com