
Charity Donation : 'राजवंशीय’ विचारसरणीला नकार देत समाजोपयोगी दृष्टिकोन ठेऊन, जगभरातील अनेकांचे आयुष्य बदलणाऱ्या टेक्नॉलॉजीचा जनक असलेले बिल गेट्स आता पुन्हा एकदा समाजाच्या भल्यासाठी चर्चेत आहेत. संपत्ती ही फक्त कुटुंबापुरती मर्यादित न ठेवता तिचा वापर व्यापक सामाजिक परिवर्तनासाठी व्हावा, असा त्यांचा स्पष्ट संदेश आहे. त्यांच्या या निर्णयानुसार, त्यांच्या अफाट संपत्तीपैकी फक्त 1 टक्काच त्यांच्या तीन मुलांना मिळेल, उर्वरित 99 टक्के संपत्ती दान केली जाईल.