

BJP Financial Report Reveals Surge in Donations and Election Spending
esakal
नवी दिल्ली: भारतीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या ताज्या आर्थिक अहवालातून भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) संपत्ती आणि उत्पन्नाचे नवे तपशील समोर आले आहेत. पक्षाने या वर्षी आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात देणग्या जमा झाल्या असून, एकूण आर्थिक व्यवहारात लक्षणीय विस्तार दिसून येत आहे. विशेष म्हणजे, नुकतेच पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडले गेलेले नितीन नवीन यांना आता या निधीच्या वापरावर पूर्ण नियंत्रण मिळणार आहे.