Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

मुंबई उच्च न्यायालयाने जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर केला आहे.
Bombay High Court allowed interim medical bail to Jet Airways founder Naresh Goyal
Bombay High Court allowed interim medical bail to Jet Airways founder Naresh Goyal Sakal

मुंबई उच्च न्यायालयाने जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर केला आहे. गोयल हे मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहेत. आरोग्याच्या समस्येच्या आधारे न्यायालयाने नरेश गोयल यांना हा जामीन दिला आहे.

न्यायमूर्ती एनजे जमादार यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने सांगितले की, गोयल यांना एक लाख रुपयांचा जामीन भरावा लागेल आणि ट्रायल कोर्टाच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुंबई सोडता येणार नाही. उच्च न्यायालयाने गोयल यांना त्यांचा पासपोर्ट जमा करण्याचे निर्देशही दिले आहेत. गोयल यांची दोन महिन्यांच्या अंतरिम जामिनावर सुटका होणार आहे. मात्र त्यांना कोर्टाने घालून दिलेल्या अटींचे पालन करावे लागणार आहे.

जामीन का मिळाला?

नरेश गोयल (वय 75) यांनी वैद्यकीय आणि मानवतावादी आधारावर अंतरिम जामीन मागितला होता. कारण नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल दोघेही कर्करोगाने ग्रस्त आहेत. फेब्रुवारीमध्ये, विशेष न्यायालयाने गोयल यांना जामीन नाकारला होता परंतु त्यांना त्यांच्या पसंतीच्या खाजगी रुग्णालयात दाखल होण्याची परवानगी दिली होती.

यानंतर गोयल यांनी उच्च न्यायालयात धाव घेत गुणवत्तेच्या आधारावर जामीन आणि वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामिनावर सुटकेची मागणी केली. गोयल यांचे वकील हरीश साळवे यांनी मानवतावादी आधारावर या खटल्याचा विचार करण्याची विनंती न्यायालयाला केली होती. तथापि, ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी जामीनाला विरोध केला आणि गोयल यांच्या रुग्णालयात भरती राहण्याची मुदत वाढवल्यास एजन्सीला कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले.

वेणेगावकर म्हणाले की, न्यायालय गोयल यांच्या रुग्णालयात दाखल होण्याचा कालावधी चार आठवडे वाढवू शकते आणि नंतर त्यांच्या प्रकृतीचे मूल्यांकन करण्यासाठी नवीन वैद्यकीय रिपोर्ट मागू शकते, परंतु साळवे म्हणाले की शारीरिक आरोग्य बिघडण्यासोबतच गोयल यांचे मानसिक आरोग्य देखील चांगले नाही.

कोणाला अटक झाली?

गोयल यांना सप्टेंबर 2023 मध्ये ईडीने मनी लाँड्रिंग केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती आणि कॅनरा बँकेने जेट एअरवेजला दिलेल्या 538.62 कोटी रुपयांच्या कर्जामध्ये हेराफेरी केली होती. ईडीने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्यावर नोव्हेंबर 2023 मध्ये त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली होती. त्यांचे वय आणि प्रकृती लक्षात घेऊन विशेष न्यायालयाने त्यांना त्याच दिवशी जामीन मंजूर केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com