
ॲड. सुकृत देव- कर सल्लागार
कें द्रीय अर्थसंकल्प २०२४ मध्ये भांडवली नफ्यावरील (कॅपिटल गेन टॅक्स) प्राप्तिकरात महत्त्वाचे बदल करण्यात आले. हे बदल करदात्याने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी (आकारणी वर्ष २०२५-२६) प्राप्तिकर विवरणपत्र भरताना लक्षात ठेवणे गरजेचे आहे. बचत व गुंतवणूक हे प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा भाग आहे. गेल्या काही वर्षांत शेअर, म्युच्युअल फंड, प्रॉपर्टी, सोने, रोखे आदी गुंतवणूक पर्यायांना पसंती वाढली आहे. यातील गुंतवणुकीतून होणाऱ्या भांडवली नफ्यावरील कराची व्याप्ती वाढविण्याचा आणि तो करकक्षेत आणण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.