DA Hike 2026: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार की प्रतीक्षा आणखी वाढणार? ३ टक्के DA बाबत मोठी अपडेट!

Why Is the DA Hike Announcement Delayed? : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. जुलै २०२६ पासून वाढीव डीए, पगारातील संभाव्य वाढ आणि थकबाकीबाबत जाणून घ्या.
Central government employees may receive a 3% DA hike from July 2026, subject to official approval

Central government employees may receive a 3% DA hike from July 2026, subject to official approval

esakal

Updated on: 

DA Hike 2026: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ कधी होणार, याकडे देशभरातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे. जुलै २०२६ पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याच्या सुधारित दराची केंद्र सरकारने २७ ऑक्टोबरपर्यंत अधिकृत घोषणा केलेली नाही. यंदा महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास सध्या ६० टक्के असलेला महागाई भत्ता ६३ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही.

महागाई भत्त्यात वाढ झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात वाढ होईल. त्याचबरोबर निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई सवलतीतही (DR) वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या दराची घोषणा कधी होणार आणि त्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीची प्रतीक्षा करावी लागणार का, असे प्रश्न कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com