

Sweet Talk, Then Shock: Donald Trump Slaps 126% Solar Tariff on India — What Comes Next?
esakal
US Tariff on India Solar Exports : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला अनपेक्षित फटका देत सौर पॅनेल्सवर १२६ टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या पावलामुळे भारतीय सौर ऊर्जा उद्योगाला मोठे आव्हान उभे राहिले आहे. अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने स्पष्ट केले की, भारत सरकारने आपल्या उत्पादकांना दिलेल्या अनुदानांमुळे त्यांना बाजारात स्वस्त दरात विक्री करता आली आणि त्याचा अमेरिकन कंपन्यांना थेट तोटा झाला. अमेरिकेने इंडोनेशियावरील उत्पादनांवर ८६ ते १४३ टक्के तर लाओसवर ८१ टक्के इतके कर देखील लावले आहे.