Mutual Funds
Mutual Fund sakal

जगातील आठवे आश्चर्य आणि म्युच्युअल फंड!

चक्रवाढ पद्धतीने मिळणारा परतावा हे जगातील आठवे आश्चर्य आहे, असे जगविख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईन म्हणायचे.

चक्रवाढ पद्धतीने मिळणारा परतावा हे जगातील आठवे आश्चर्य आहे, असे जगविख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईन म्हणायचे. आईन्स्टाईन म्हणत, की ज्याला चक्रवाढ पद्धतीने मिळणाऱ्या परताव्याचे महत्त्व कळले, तो त्याचा पुरेपूर फायदा करून घेतो आणि ज्याला त्याचे महत्त्व कळले नाही, तो चक्रवाढ पद्धतीने व्याज देत राहातो.

आजकाल आपल्या गुंतवणुकीवर ठराविक दराने चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळाले, तर किती कालावधीत आपली गुंतवणूक कितीपट वाढेल, हे ताबोडतोब सांगणारे ऑनलाइन कॅलक्युलेटर उपलब्ध आहेत. अर्थात, हे केवळ माहिती म्हणून पाहाण्यापेक्षा त्याचे एखादे उदाहरण पाहायला मिळाले, तर ते अधिक परिणामकारक ठरते. म्युच्युअल फंडातील परतावादेखील चक्रवाढ पद्धतीने मोजला जातो.

दीर्घकाळात अतिशय चांगल्या दराने चक्रवाढ पद्धतीने परतावा देणारे अनेक म्युच्युअल फंड आहेत, त्यापैकी एका म्युच्युअल फंडाची माहिती घेऊ या. या फंडाने चक्रवाढ पद्धतीने गेल्या वीस वर्षांत सरासरी पंधरा टक्के वार्षिक परतावा दिला आहे आणि त्या फंडाचे नाव ‘क्वान्ट’ (Quant) मिड कॅप फंड आहे.

‘क्वान्ट’ मिड कॅप फंड

मार्च २००१ मध्ये बाजारात आलेला हा फंड सुरुवातीपासूनच उत्तम कामगिरी करत आहे. अल्पकाळात या फंडाने उत्तम परतावा दिला आहेच आणि दीर्घकाळातसुद्धा आश्चर्यकारक परतावा दिला आहे. हा फंड बाजारात आल्यापासून वेगवेगळ्या टप्प्यांवर या फंडात एकरकमी गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे सध्याचे बाजारमूल्य पुढीलप्रमाणे आहे.

वरील उदाहरणावरून लक्षात येते, की जेवढा दीर्घकाळ आपली गुंतवणूक सुरू राहते, तेवढे आश्चर्यकारक फायदे आपल्याला मिळतात. उदा. एक वर्षाच्या कालावधीसाठी परतावा टक्केवारीमध्ये अधिक असला, तरी दहा लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य फारसे वाढलेले दिसत नाही. याउलट वीस वर्षांच्या कालावधीत सरासरी वार्षिक परतावा तुलनेने कमी असला, तरी मिळणारा फायदा हा गुंतवणुकीच्या तब्बल वीसपटीपेक्षा अधिक झाला आहे.

हा फंड प्रामुख्याने मिड कॅप म्हणजेच मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतो. उत्पादन क्षेत्र, बँकिंग क्षेत्र याबरोबर ऑइल अँड गॅस, औषध निर्माण, केमिकल उत्पादन आणि बायोटेक्नॉलॉजी या क्षेत्रातील कंपनांच्या शेअरमध्ये या फंडाची गुंतवणूक आहे.

वीस वर्षांपूर्वी एकरकमी दहा लाख रुपये गुंतवणे प्रत्येक गुंतवणूकदाराला सहजासहजी शक्य नव्हते, हा मुद्दा मान्य केला, तरी प्रत्येक गुंतवणूकदाराने त्याच्या त्यावेळच्या आर्थिक परिस्थितीनुसार जेवढी शक्य होती तेवढी गुंतवणूक केली असती, तरी त्याचा भरघोस परतावा त्याला आजच्या घडीला दिसलाच असता.

अशा गुंतवणूकदारांनी त्यांच्या एकरकमी गुंतवणुकीला दीर्घकाळासाठी त्याच फंडातील ‘एसआयपी’ची जोड दिली असेल, त्यांना त्याचा फायदा मिळाला आहे. या फंडातील दहा वर्षांच्या कालावधीच्या ‘एसआयपी’नेदेखील तब्बल २५ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. येथे अजून एक प्रश्न उपस्थित होतो, की या फंडाचा एका वर्षातील परतावा ७५ टक्के एवढा प्रचंड आहे.

येणाऱ्या काळात हा परतावा तेवढाच राहील का? याचे उत्तर असे देता येईल, की म्युच्युअल फंडाच्या परताव्याचा आढावा घेण्यासाठी एक वर्षाचा कालावधी हा खूप छोटा आहे. येणाऱ्या वर्षातदेखील गेल्या वर्षासारखाच परतावा मिळेल, याची खात्री देणे शक्य नाही परंतु, फंडाच्या गुंतवणुकीची संकल्पना पाहता हा फंड दीर्घकाळात चांगली कामगिरी करेल असे वाटते. बाजारात असे उत्तम कामगिरी करणारे अनेक फंड उपलब्ध आहेत. दीर्घकाळात चक्रवाढ पद्धतीने मिळणारा फायदा समजून घेण्यासाठी वरील फंड फक्त उदाहरणासाठी घेतला आहे.

(डिस्क्लेमर : म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेशी संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com