
मुंबई - माझ्या सहा वर्षांच्या कार्यकाळात मी सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न केला असून, या काळात रिझर्व्ह बँक आणि अर्थ मंत्रालय यांच्यातील संबंध सर्वोत्तम राहिले आहेत, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज येथे केले. दास यांचा आज त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटचा दिवस होता. त्यानिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदावरून दास आज निवृत्त झाले.