NIFTY Next 50 : ‘निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्स’वर डेरिव्हेटिव्ह व्यवहारांची सुविधा

राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) ‘निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्स’वर फ्युचर्स आणि ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट्स सुविधा गुरुवारी (ता. २४) दाखल केली.
NIFTY Next 50
NIFTY Next 50sakal

मुंबई : राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) ‘निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्स’वर फ्युचर्स आणि ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट्स सुविधा गुरुवारी (ता. २४) दाखल केली. सलग पाचव्या वर्षी जगातील सर्वांत मोठे डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंज ठरलेल्या ‘एनएसई’ने सुरू केलेल्या या सुविधेला व्यापाऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.

इंडेक्स डेरिव्हेटिव्हमध्ये देशभरातील ३७५ हून अधिक व्यापारी सदस्य सहभागी झाले होते. यामध्ये ईस्ट इंडिया सिक्युरिटीज आणि सॅमको सिक्युरिटीज लि. यांचा समावेश आहे. पहिल्याच दिवशी १२२३ कोटी रुपयांचे करार झाले. फ्युचर्समध्ये ७८.१६ कोटी आणि ऑप्शन्समध्ये प्रीमियम टर्नओव्हरचे १.५५ कोटी रुपयांचे १७२४ करार झाले. एक्स्चेंजने ऑक्टोबर २०२४ पर्यंत डेरिव्हेटिव्ह व्यवहारांवर शुल्क माफी दिली आहे.

NIFTY Next 50
Share Market Today: अमेरिकेचा जीडीपी घसरला; भारतीय बाजारांवर परिणाम होणार का?

‘एनएसई’चे मुख्य व्यवसाय विकास अधिकारी श्रीराम कृष्णन म्हणाले, ‘‘निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्स’वर डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्स यशस्वीपणे दाखल करण्यासाठी आम्ही सर्व ट्रेडिंग सदस्य आणि सर्व भागधारकांचे आभार मानतो. यामुळे जोखीम व्यवस्थापनासाठी अतिरिक्त पर्याय उपलब्ध झाला आहे’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com