Women's Day 2024 : महिलांनो! आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हायचं असेल, तर आजच घ्या 'हे' निर्णय.. वाचा सविस्तर

Financial Empowerment : बहुतेक स्त्रिया त्यांच्या आर्थिक निर्णयांसाठी इतरांवर अर्थात वडिल, भाऊ, पती यांवर अवलंबून असतात. महिलांना स्वतःहून आर्थिक निर्णय घेण्याबद्दल संकोच वाटतो.
Finance Tips for Women
Finance Tips for WomeneSakal

Financial Tips for Women : महिलांनी विविध क्षेत्रात नवीन उंची गाठली आहे. क्रीडा असो वा व्यवसाय, राजकारण, सर्वच क्षेत्रात महिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पण एक क्षेत्र असे आहे की जिथे मोठ्या संख्येने महिला थोड्या मागे आहेत आणि ते म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी काही निर्णय स्वतः घेतले पाहिजेत. कोणत्या आहेत या गोष्टी जाणून घेऊयात...

1. स्वतःचे आर्थिक निर्णय घ्या

बहुतेक स्त्रिया त्यांच्या आर्थिक निर्णयांसाठी इतरांवर अर्थात वडिल, भाऊ, पती यांवर अवलंबून असतात. महिलांना स्वतःहून आर्थिक निर्णय घेण्याबद्दल संकोच वाटतो. तुमच्या पालकांशी, जोडीदाराशी किंवा अगदी आर्थिक सल्लागारांशी पैशाशी संबंधित बाबींबद्दल मोकळेपणाने बोला आणि तुम्हाला काही प्रश्न असल्यास विचारण्यास लाजू नका. यामुळे तुमच्यात स्वतःहून आर्थिक निर्णय घेण्याचा आत्मविश्वास निर्माण होईल.

2. संकटाचा सामना करण्यासाठी एमर्जन्सी फंड

संकटाचा सामना करण्यासाठी महिलांनी नेहमी बचत करून ती रक्कम एमर्जन्सी फंड म्हणून स्वत:कडे ठेवावी. हा फंड तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी मदत करू शकतो. तुमच्या आयुष्यात काही वाईट घडले, जसे की तुमची नोकरी गेली किंवा तुम्ही आजारी पडलात तर हा निधी उपयोगी पडू शकतो.

Finance Tips for Women
Women's Day 2024 : महिला दिनानिमित्त तुमच्या घरातील 'लक्ष्मी'ला करा आर्थिकदृष्ट्या बळकट; द्या हे खास गिफ्ट!

3. विमा अत्यंत महत्त्वाचा

महिलांसाठी चांगली विमा योजना असणे फार महत्वाचे आहे. अचानक आलेल्या आजारामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे वेळेत विमा संरक्षण घेणे केव्हाही चांगले ठरते. गंभीर आजार झाल्यास वैद्यकीय खर्च भरून काढण्यासाठी आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करणे आवश्यक आहे. यासोबतच गंभीर आजारांची माहिती घेतल्यानंतर वार्षिक आरोग्य तपासणी व इतर चाचण्या कराव्यात, जेणेकरून त्यांच्यावर वेळीच उपचार करता येतील. टर्म इन्शुरन्समध्ये, तुम्हाला चांगले विमा कवच मिळते, तेही खूप कमी प्रीमियममध्ये, तेव्हा नक्की विचार करा.

4. रिटायरमेंट प्लानिंग आवश्यक

नोकरी करताना आपण घर, गाडी खरेदी करण्यात आणि मुलांच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी भांडवल उभारण्यात व्यस्त असतो आणि स्वतःसाठी नियोजन करायला वेळ मिळत नाही. पण या सगळ्यासोबत तुम्हाला रिटायरमेंट प्लानिंग करणेही महत्त्वाचे आहे. याला वेळ लावल्यास पुरेसे भांडवल गोळा करणे शक्य होणार नाही आणि निवृत्तीनंतर आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. त्यासाठी, शक्य तितक्या लवकर गुंतवणूक सुरू करा.

5. डिस्काउंटपासून दूर राहा

अनेक दुकाने आणि वेबसाइट सवलत अर्थात डिस्काउंट देत असतात. पण या डिस्काउंटच्या प्रलोबनापासून दूर राहा असा सल्ला आम्ही देऊ इच्छितो. सवलत दोन प्रकारे उपलब्ध आहे. पहिली म्हणजे कॅश डिस्काउंट आणि दुसरी पर्सेंटेज डिस्काउंट. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर कंपन्या कॅश डिस्काउंट देतात. हे डिस्काउंट एमआरपीवर उपलब्ध आहे. डिस्काउंट कायम बदलत राहाते. त्यामुळे काहीही खरेदी करण्यापूर्वी याचा विचार करा. याच्या मदतीने तुम्ही खूप बचत करू शकता.

Finance Tips for Women
Women's Day 2024 : मुलीच्या भविष्याची चिंता सोडा.. 'या' योजनेत गुंतवणूक केल्यास केवळ व्याजाचेच मिळतील 18 लाख! जाणून घ्या

6. वेळेवर गुंतवणूक सुरू करा

अनेक महिला गुंतवणुकीचा विचार करत नाहीत आणि त्यामुळे वेळ वाया जातो ज्यामध्ये गुंतवणुकीमुळे चांगला परतावा मिळू शकला असता. जितक्या लवकर एखाद्याने गुंतवणूक करणे सुरू केले तितके जास्त परतावा मिळण्याची शक्यता जास्त असते. भारतात जवळपास प्रत्येकाने गुंतवणूक केली असली तरी अजूनही काही स्त्रिया अशा आहेत ज्या कोणतेही नियोजन करत नाहीत. त्यांचे पैसे फक्त बँकेतच जमा होतात. अशा परिस्थितीत, जर त्यांनी विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली, तर त्यांना त्यांच्या रोजच्या खर्चासोबत पॉलिसीचा प्रीमियमही स्वतः भरता येईल.

7. जास्त परतावा देणाऱ्या पर्यायांमध्ये पैसे गुंतवा

तुम्ही फक्त एफडी (FD) किंवा पीपीएफसारख्या (PPF) पारंपारिक गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक केल्यास परतावाही एकसारखा मिळतो. पण तुम्ही फक्त एका प्रकारच्या गुंतवणुकीच्या पर्यायांपासून दूर जात आणि फास्ट रिटर्न देणाऱ्या पर्यायांमध्ये पैसे गुंतवावेत. जर तुम्ही म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे पैसे गुंतवले तर तुम्हाला खूप फायदा होईल.

Finance Tips for Women
Women's Day 2024 : महिलांनो, स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय? 'या' सरकारी योजना करतील मोठी मदत.. जाणून घ्या

8. क्रेडिट स्कोअर तयार करा

एखाद्या व्यक्तीच्या क्रेडिट क्षमतेच्या आधारावर कर्ज उपलब्ध होते. क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड (CIBIL) तुम्हाला 300 ते 900 अंकादरम्यान स्कोअर देते. तुमच्या मागील क्रेडिट कार्डचा वापर, तुम्ही तुमचे बँक खाते कसे राखता, कोणतेही धनादेश बाऊन्स झाले आहेत का, कर्जे, विमा नसलेली कर्जे, कर्जाची परतफेड आणि तुम्ही किती वेळा कर्ज घेतले आहे किंवा अर्ज केला आहे याच्या आधारावर हे ठरवले जाते. ज्या लोकांचा सिबील स्अकोर 700 पेक्षा जास्त आहे त्यांना सहज कर्ज मिळू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com