आर्थिक नियोजन सहलींचे!

मे महिना सुरू झाला, की शाळा, महाविद्यालयीन मुलांच्या सुट्या सुरू होतात आणि कौटुंबिक सहलींच्या नियोजनासही सुरुवात होते.
Financial planning and summer trip digital how to save money to use later
Financial planning and summer trip digital how to save money to use latersakal

मे महिना सुरू झाला, की शाळा, महाविद्यालयीन मुलांच्या सुट्या सुरू होतात आणि कौटुंबिक सहलींच्या नियोजनासही सुरुवात होते. अशा सहलींचे नियोजन करताना आर्थिक नियोजनही आधीच केल्यास आपला आनंद द्विगुणित होऊ शकतो.

हॉटेल, तिकीटांचे आरक्षण

सहलीचे ठिकाण निश्चित झाले, की तिथे जाण्यासाठी रेल्वे, विमान तिकीटांचे आरक्षण करणे ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते. तिकीटांचे आरक्षण जितक्या लवकर कराल, तितका लाभ होण्याची शक्यता वाढते.

सुट्यांच्या हंगामात विमान तिकीटांच्या किमती वाढतात. विविध वेबसाईटद्वारे घरबसल्या हे आरक्षण करता येते. त्याचप्रमाणे हॉटेलमधील खोलीदेखील ऑनलाइन आरक्षित करता येते. डिजिटल वॉलेट किंवा क्रेडिट कार्ड वापरून नोंदणी केल्यास काही कॅशबॅक अथवा डिस्काउंट ऑफरचा लाभ घेता येतो.

घरगुती निवासव्यवस्था

आपण जात असलेल्या सहलीच्या ठिकाणी राहाण्याची आणि जेवण्याची घरगुती सोय आहे का, याची माहिती घ्यावी. अशा घरगुती वातावरणात राहिल्याने त्या ठिकाणी असलेल्या स्थानिक सोयी, वेगवेगळी ठिकाणे, तिथली जीवनशैली, खाद्यसंस्कृती याचा अनुभव घेता येतो.

शिवाय महागड्या हॉटेलच्या तुलनेत त्याचा खर्चदेखील खूपच कमी येतो. हॉटेलमध्ये पुरवल्या जाणाऱ्या अनेक सुविधांचा आपण वापर करत नाही आणि प्रत्येकवेळी अशा सुविधांची आवश्यकतादेखील नसते. त्यामळेे घरगुती ठिकाणी मिळणाऱ्या सुविधांची आधीच खातरजमा केल्यास कमी पैशांत काम होऊ शकते.

सामूहिक प्रवास

सहलींवर होणारा सर्वाधिक खर्च हा प्रवासखर्चावर होत असतो. त्यामुळे एकट्याने प्रवास करण्यापेक्षा मित्रमंडळी किंवा नातेवाईक यांच्यासोबत सामूहिक प्रवासाची योजना आखल्यास, एकूण खर्च सर्वांमध्ये विभागला जातो. खर्च बजेटमध्ये होतो व एकत्रितपणे आनंदही घेता येतो.

पैशांची तरतूद

सहलीसाठी किती खर्च येऊ शकतो याचा अंदाज एक वर्षआधी घेऊन, त्याप्रमाणे वर्षभर दरमहा ठराविक रक्कम रिकरिंग खात्यात जमा केल्यास वर्षाच्या शेवटी मुद्दल आणि व्याज मिळून मोठी रक्कम मिळते. म्युच्युअल फंडात ‘एसआयपी’ करून त्यावरील नफा सहल खर्चासाठी वापरू शकतो. प्राप्तिकराच्या नियमांचे पालन करून करबचतदेखील करता येते. काही कारणांनी सहल रद्द झाली किंवा पुढे ढकलली गेली, तरी खात्यातील पैशांवर परतावा मिळत राहतो. थोडक्यात, योग्य आर्थिक नियोजनाअभावी वेगवेगळ्या गोष्टींसाठी होणारा खर्च आणि त्यामुळे होणारा मानसिक त्रास टाळता येऊ शकतो आणि सहलीचा आनंद घेऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com