Subhash Dandekar News : कॅम्लिन उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष सुभाष दांडेकर यांचे निधन

Subhash Dandekar passed away : उद्योजक सुभाष दांडेकर यांचे आज (१५ जुलै) सकाळी सातच्या दरम्यान निधन झाले
Former Chairman of camlin industrialist Subhash Dandekar passed away marathi news
Former Chairman of camlin industrialist Subhash Dandekar passed away marathi news
Updated on

मागील दोन-तीन पिढ्यांतील शालेय विद्यार्थ्यांच्या आयुष्यात इंद्रधनुष्यातील सप्तरंग भरून त्यांचे जीवन रंगीबेरंगी करणारे कॅम्लीन उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा सुभाष दांडेकर (वय ८५) यांचे सोमवारी सकाळी अल्पआजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘कॅम्लीन फाईन सायन्सेस’चे संस्थापक व ‘कोकुयो कॅम्लीन’चे अध्यक्ष या नात्याने त्यांनी हजारो मराठी तरुणांना रोजगार दिला होता. दांडेकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक उद्योजक, मान्यवरांनी शोक व्यक्त केला.

प्रकृती कारणास्तव मागील वर्षभरापासून ते फारसे घराबाहेर पडत नव्हते; मात्र तोपर्यंत ते नियमित योगासने, मॉर्निंगवॉक, जलतरण नियमितपणे करीत होते. त्यांच्यामागे मुलगा आशिष, मुलगी अनघा, भाऊ दिलीप, पुतण्या श्रीराम, तसेच नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी रजनी दांडेकर यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते.


कॅम्लीन म्हटले की शालेय मुलांचे चित्रकलेचे साहित्य, कंपास बॉक्स, आदी डोळ्यासमोर येते. चित्रकलच्या साहित्याचा उद्योग नावारूपाला आणण्यासाठी दांडेकर यांनी अथक मेहनत घेतली होती. त्यामुळेच चित्रकलेचे रंग व साहित्य म्हणजे कॅम्लीन, असे समीकरणच १९८० च्या दशकात निर्माण झाले आणि बरेच वर्षे ते कायम होते. त्यामुळे दांडेकर यांच्या निधनामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील इंद्रधनुष्याचे रंगच मावळले, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत होती.
दांडेकर यांनी कॅम्लीनमधून अधिकृतपणे निवृत्ती घेतली होती, तरीही व्यवसायाची सूत्रे सांभाळणाऱ्या कुटुंबीयांना ते शेवटपर्यंत मार्गदर्शन करत होते.

२०२० पर्यंत ते कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष होते. ‘कोकुयो कॅम्लीन’चे मानद अध्यक्ष असलेले दांडेकर हे दादरच्या सुश्रुषा सहकारी रुग्णालयाचे अध्यक्ष, महालक्ष्मी मंदिराचे विश्वस्त म्हणून अखेरपर्यंत सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्षही होते, तसेच ‘सिकॉम’ या उद्योग संघटनेचे मार्गदर्शकही होते. त्यांना ‘गेम चेंजर ऑफ महाराष्ट्र’ आणि ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले होते.


वडिलांचा वारसा सक्षमपणे चालवला


वडील दिगंबर दांडेकर यांनी कॅम्लीन समूहाची स्थापना केल्यानंतर त्याला आधुनिक रूप देऊन नावारूपाला आणण्यात सुभाष दांडेकर यांचा मोलाचा वाटा होता. १९६० मध्ये इंग्लंडमधून एमएससी केल्यावर त्यांनी चित्रकलेच्या रंगांच्या व्यवसायावर लक्ष देण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी प्रयोगशाळेत तासनतास संशोधन केले व त्या रंगांना ‘एसीएमआयजी’चे सुरक्षा प्रमाणपत्रही त्यांनी मिळवले. या रंगाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी त्यांनी स्वतः संशोधन केले. त्यांच्या धडपडीमुळे हे दर्जेदार रंग म्हणून कलाकारांच्या पसंतीला उतरले. त्याचेच फळ म्हणून या रंगांचे नाव सर्वतोमुखी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com