महाराष्ट्रातून गेलेली कंपनी कर्नाटकात करणार ६,००० कोटींची गुंतवणूक : Foxconn Investment In India | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

foxconn

Foxconn Investment In India: महाराष्ट्रातून गेलेली कंपनी कर्नाटकात करणार ६,००० कोटींची गुंतवणूक

बंगळुरु : आयफोन सप्लायर कंपनी असलेली फॉक्सकॉन कंपनी कर्नाटकातील बंगळुरु इथं नवा मॅन्युफॅक्चरिंग कारखाना सुरु करणार आहे. यासाठी कंपनी सुमारे ५,७४० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यापूर्वी या कंपनीचा सेमिकंडक्टरचा एक प्रोजेक्ट राज्यात पुणे जिल्ह्यातील तळेगाव इथं येणार होता. पण कालांतरानं हा प्रोजेक्ट गुजरातमध्ये हालवण्यात आला होता. यामुळं राज्यात मोठा राजकीय गदारोळही झाला होता. (Foxconn Investment In India recently company moved from Maharashtra now plan to invest in Karnataka)

अमेरिका आणि चीनमध्ये सध्या सुरु असलेल्या टेन्शनच्या पार्श्वभूमीवर फॉक्सकॉन ही अॅपल फोन बनवणारी तैवानची बडी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी भारतात गुंतवणुकीच्या दृष्टीनं पाहात आहे. भारतात अॅपलच्या मॅन्युफॅक्चरिंगचं हब बनवण्याच्या दृष्टीनं ते पावलंही टाकत आहेत.

ब्लुमबर्गच्या रिपोर्टनुसार, फॉक्सकॉन आयफोनचे पार्ट्स बनवण्यासाठी बंगळुरु एअरपोर्टजवळ ३०० एकर जागेत प्रोजेक्ट उभारण्याची तयारी करत आहे. यामध्ये आयफोनचं असेम्ब्लिंग आणि प्रॉडक्शन करण्याबरोबरच आपला इलेक्ट्रिक व्हेईकलचा बिझनेसही सुरु करण्याच्या विचारात आहे.

बंगळुरुमध्ये होणारी फॉक्सकॉनची ही गुंतवणूक भारतातील सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचं सांगितलं जात आहे. चीनमधून भारतात शिफ्ट होताना कंपनी ही मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. या गुंतवणुकीमुळं १ लाख नव्या नोकऱ्या निर्माण होणार असल्याचंही सांगितलं जात आहे. फॉक्सकॉनचे चेअरमन योंग ली हे नुकतेच भारताच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी हैदराबादमधील तेलंगाणात आयफोनच्या हार्डवेअर प्रोटोटाईप फॅसिलिटी सेंटरचे तसेच टी वर्क्स युनिटचं उद्घाटन केलं.

टॅग्स :Sakal Money