‘केवायसी’च्या नावावर फसवणूक

‘केवायसी’ म्हणजे (नो युअर कस्टमर) नियमांतर्गत ग्राहकाची माहिती, सरकारी फोटो आयडीसह अद्ययावत करणे. ‘
fraud alert in the context of kyc cyber crime
fraud alert in the context of kyc cyber crimeSakal

- शिरीष देशपांडे

‘केवायसी’ म्हणजे (नो युअर कस्टमर) नियमांतर्गत ग्राहकाची माहिती, सरकारी फोटो आयडीसह अद्ययावत करणे. ‘केवायसी’ करणे हे रिझर्व्ह बँकेच्या नियमांना अनुसरून सर्व बँका, म्युच्युअल फंड, सर्व फायनान्स कंपन्या आणि दूरसंचार कंपन्या यांना लागू आहे. बँका, म्युच्युअल फंड, फायनान्स कंपन्या आणि दूरसंचार कंपन्या ठरावीक काळानंतर ‘केवायसी’ अद्ययावत करण्याची मोहीम राबवत असतात.

बहुतेक सर्व खातेदार आणि गुंतवणूकदार यांना याची कल्पना असते. मात्र, अनेकदा गडबडीत हे काम वेळेत होत नाही, समक्ष जाण्यास वेळ नसतो आणि वयानुसार गोष्टी लक्षात राहात नाहीत. या सर्व परिस्थितीचा सायबर गुन्हेगार फायदा घेत असून, अगदी सहजपणे लोक त्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. ‘केवायसी’च्या नावाखाली येणारे फोन, एसएमएस, लिंकबाबत सावधगिरी बाळगणे आवश्‍यक आहे.

चित्रपट कलाकाराला गंडा

चित्रपटसृष्टीतील एका कलाकाराला, एका अनोळखी नंबरवरून एक ‘एसएमएस’ आला. त्याने त्या ‘एसएमएस’मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केले. चोरट्यांनी त्या लिंकद्वारे एक ॲप डाउनलोड करायला लावून, त्याद्वारे एक लाख ५० हजार रुपये लुबाडले.

ज्येष्ठ महिलेची फसवणूक

एका ज्येष्ठ महिलेला एक फोन आला, फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने बँकेतून बोलतोय, असे सांगून बँक खात्याची ‘केवायसी’ करणे बाकी आहे, असे सांगितले. त्यावर त्या महिलेने उद्या बँकेत येऊन करेन, असे उत्तर दिले. तेव्हा ही प्रक्रिया ऑनलाइन करता येत असल्याने बँकेत येण्याची गरज नसल्याचे त्याने सांगितले.

ऑनलाइन प्रक्रिया माहित नसल्याचे त्या महिलेने सांगताच, त्या बोगस बँक अधिकाऱ्याने एक लिंक पाठवतो, ती क्लिक केल्यास त्यावर सर्व माहिती मिळेल, असे सांगितले. त्यावर विश्‍वास ठेवून त्या महिलेने आलेल्या लिंकवर क्लिक केले. त्याबरोबर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून तीन व्यवहारांमध्ये एकूण ४ लाख ९१ हजार रुपये काढून घेतल्याचे दिसून आले.

वरील दोन्ही घटनांमध्ये

समोरच्या व्यक्तीने पाठविलेल्या लिंकवर क्लिक करताच मोबाइल फोनमध्ये फसवे ॲप डाउनलोड झाले. त्यामुळे चोरट्यांना बँक खात्यात व्यवहार करण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यांनी गोड बोलून भुरळ पाडत पैसे ट्रान्स्फरच्या सूचना आणि ‘ओटीपी’ भरायला लावून पैसे काढून घेतले. त्यामुळे ‘केवायसी’च्या नावाखाली येणाऱ्या फोनबाबत सावधगिरी बाळगणे आणि आपली फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहणे महत्त्वाचे आहे.

अशी घ्या काळजी...

  • सर्व अपरिचित फोन, एसएमएस, लिंक हे खोटे किंवा फसवे आहेत समजा.

  • कोणतीही बँक अथवा बँक अधिकारी ग्राहकांना फोन करून ‘केवायसी’ अपडेट करा, असे सांगत नाही.

  • कोणत्याही अपरिचित व्यक्तीला तुमची वैयक्तिक माहिती देऊ नका.

  • समक्ष जाण्याचा कंटाळा करू नका.

फसवणूक झाल्यास...

तत्काळ https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.

त्वरित १९३० /१५५२६० या नंबरवर संपर्क साधा. ही यंत्रणा तातडीने योग्य ती कार्यवाही करेल. येथे फोन करण्याआधी पैसे ट्रान्स्फर व्यवहाराचा संदर्भ नंबर (Transaction ID) तयार ठेवा. हा तपशील दिल्यास पोलिसांच्या मदतीने व्यवहार थांबविणे शक्य होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com