Adani Power : अदानींची मोठी डील, भारताला नाही तर 'या' देशाला देणार स्वस्त दरात वीज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Adani Power

Adani Power : अदानींची मोठी डील, भारताला नाही तर 'या' देशाला देणार स्वस्त दरात वीज

Adani Power : अदानी पॉवरने बांगलादेशला कमी दरात वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, देशातील सध्याच्या कोळशावर चालणाऱ्या प्रकल्पांच्या उत्पादनाचा खर्च लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. (Adani Power To Supply Electricity To Bangladesh) 

प्रोथोम अलो या वृत्तपत्राने अदानी समुहाच्या अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटले आहे की, बांगलादेशचे कारखाने ज्या किंमतीला कोळसा विकत घेतात त्याच किंमतीला अदानी समूह कोळसा आयात करेल.

अहवालानुसार, भारतीय कंपनीने बांगलादेशातील रामपाल आणि पायरा सारख्या कोळशावर चालणार्‍या कारखान्यांच्या खरेदी किंमतीत सुधारणा करण्यास सहमती दर्शवली आहे.

बांगलादेशच्या अधिकाऱ्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. वृत्तपत्रानुसार, बांगलादेशातील अदानी समूहाच्या एका जबाबदार अधिकाऱ्याने प्रोथोम अलो वृत्तपत्रामधील बातमीला दुजोरा दिला आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला, बांगलादेशच्या राज्य-संचालित पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाने (PDB) 2017 मध्ये अदानी पॉवरसोबत केलेल्या वीज खरेदी करारामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामुळे कोळशावर आधारित वीज महाग झाली होती.

पीडीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, अदानी पॉवरने बांगलादेशच्या अधिकाऱ्यांसह पाच सदस्यीय शिष्टमंडळ चर्चा करण्यासाठी पाठवले आहे.

किंबहुना, बांगलादेशसोबतच्या वादाचे मुख्य कारण म्हणजे झारखंडमधील अदानीच्या प्लांटमधून 'जास्त दराने कोळसा खरेदी' हे आहे.

वृत्तानुसार, बांगलादेशला झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यात असलेल्या 1,600 मेगावॅट प्रकल्पासाठी कोळसा आयात करण्याच्या उद्देशाने एलसी (लाईन ऑफ क्रेडिट) उघडण्याची विनंती मिळाल्यानंतर बांगलादेशने किंमत सुधारण्याची मागणी केली.

यूएस-आधारित इन्स्टिट्यूट फॉर एनर्जी इकॉनॉमिक्स अँड फायनान्शियल अॅनालिसिस (IEEFA) ने 2018 च्या आधीच्या अहवालात अदानी प्रकल्प "बांगलादेशसाठी खूप महाग आणि खूप धोकादायक" असल्याचे म्हटले आहे.

बांगलादेश सध्या भारताकडून 1,160MW वीज आयात करतो, तर 2017 च्या करारानुसार बांगलादेश अदानी पॉवर लिमिटेडकडून 25 वर्षांसाठी वीज विकत घेतली आहे आणि यावर्षी मार्चपासून वीज मिळण्यास सुरुवात होणार आहे.