
आज गुरुवार, 5 जून 2025 रोजी सोने आणि चांदीच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 99,180 रुपये प्रति 10 ग्रामवर पोहोचला आहे, तर जीएसटीसह हा भाव 1,02,588 रुपये प्रति 10 ग्राम इतका आहे. चांदीच्या किंमतीतही 2,000 रुपयांची वाढ होऊन ती 1,04,000 रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता आणि अमेरिकेतील आर्थिक संकेत यामुळे या किंमतींमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत.