

Robert Kiyosaki Gold Price Prediction
eSakal
Robert Kiyosaki Gold Price Prediction : ‘रिच डॅड पुअर डॅड’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. अलीकडे सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या पोस्टनंतर सराफा बाजारात खळबळ उडाली आहे. कियोसाकी यांनी पुढील वर्षभरात सोन्याचे भाव गगनाला भिडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.