Google Employees Arrested: Google CEO कार्यालयात घुसले पोलीस, अनेकांना अटक, काय आहे गाझा-इस्राइल कनेक्शन?

Google Employees Arrested: गुगलच्या न्यूयॉर्क आणि सनीवेल, कॅलिफोर्नियातील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धरणे आंदोलनानंतर अटक करण्यात आली.
Google Employees Arrested
Google Employees Arrestedesakal

Google Employees Arrested: न्यूयॉर्क आणि सनीवेल, कॅलिफोर्निया येथील गुगलच्या कार्यालयांमध्ये एकूण नऊ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. गुगलने इस्रायलसोबत केलेल्या 2021 च्या कराराच्या विरोधात कर्मचारी धरणे आंदोलन करत होते. द वॉशिंग्टन पोस्टने याबाबत माहिती दिली आहे.

गुगलच्या न्यूयॉर्क आणि सनीवेल, कॅलिफोर्नियातील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धरणे आंदोलनानंतर अटक करण्यात आली. गाझामध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गुगलच्या इस्राइलसोबतच्या कराराविरोधात कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली आहे. गुगलच्या गुगलच्या कार्यालयांमधून एकूण नऊ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. एका आंदोलकाने अटकेचा व्हिडिओ शेअर केल्याचेही समोर आले आहे.

न्यूयॉर्कमधील गुगलच्या कार्यालयात पोलीस आले आणि आंदोलकांना शांत राहण्यास सांगितले, त्यानंतर त्यांना कार्यालय सोडण्यास सांगण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. असे न केल्यास अचक करण्याता इशारा देखील पोलिसांनी दिला. मात्र आंदोलक ठाम होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली.

Google Employees Arrested
Mukesh Ambani: अंबानी आर्थिक क्षेत्रात करणार मोठा धमाका; जगातील सर्वात शक्तिशाली कंपनीशी केला करार

गुगलच्या प्रवक्ते बेली टॉमसन यांनी सांगितले की, कंपनीच्या धोरणाला विरोध करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच, ज्या कर्मचाऱ्यांनी इतर कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली, त्यांच्यावर कंपनी कारवाई करणार आहे.

मंगळवारी आंदोलकांनी न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्नियामधील कार्यालयांमध्ये प्रवेश केला. यानंतर त्याने कंपनीचा निषेध करण्यास सुरुवात केली. Google ने आपला 1.2 अब्ज अमेरिकन डॉलरचा करार मागे घ्यावा, जो त्याने Amazon च्या सहकार्याने केला आहे. ॲमेझॉन इस्रायल सरकारला क्लाउड सेवा आणि डेटा सेवा देत आहे, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. निंबस म्हणून ओळखला जाणारा करार 2021 मध्ये Google ने स्वाक्षरी केली होती.

विशेष म्हणजे इस्राइल सरकारने गुगल आणि ॲमेझॉन या दोन्ही कंपन्यांना हे कंत्राट दिले आहे. रिपोर्टनुसार, ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्यांनीही निंबसला विरोध दर्शवला आहे.

Google Employees Arrested
IPL 2024 Ticket Price: आरसीबीच्या एका सामन्याच्या तिकिटाची किंमत 52,938 रुपये; कोण ठरवत किंमत?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com