GST : १.६८ लाख कोटींचा महसूल जीएसटीतून जमा; गेल्यावर्षीच्या तुलनेत १२.५ टक्क्यांची वाढ

केंद्र सरकारने फेब्रुवारीमध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी वसुलीमधून १.६८ लाख कोटींचा महसूल जमा केला आहेत. हा महसूल गेल्यावर्षीच्या तुलनेत १२.५ टक्क्यांनी जास्त आहे.
GST collection in February 2024 rises 12 5 percent to rs 1 68 lakh crore
GST collection in February 2024 rises 12 5 percent to rs 1 68 lakh croreSakal

नवी दिल्ली : केंद्र सरकारने फेब्रुवारीमध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी वसुलीमधून १.६८ लाख कोटींचा महसूल जमा केला आहेत. हा महसूल गेल्यावर्षीच्या तुलनेत १२.५ टक्क्यांनी जास्त आहे. फेब्रुवारी २०२३मध्ये जीएसटीमधून १.४९ लाख कोटी जमा झाले होते. जानेवारीमध्ये सरकारने जीएसटीमधून १.७२ लाख कोटी जमा केले होते.

सरकारचा महसूल संकलनाची आकडेवारी १.५ लाख कोटींच्यावर पोहोचली आहे. आतापर्यंत, एप्रिल २०२३मध्ये सर्वाधिक जीएसटी संकलन करण्यात आले होते, हा आकडा १.८७ लाख कोटींच्या पुढे गेला होता. याशिवाय, सलग २३ महिन्यांपासून देशाचे जीएसटी संकलन १.४ लाख कोटींवर राहिले आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी २०२४मध्ये जीएसटी संकलन १,६८,३३७ कोटी होते. यामध्ये सीजीएसटी ३१,७८५ कोटी, एसजीएसटी ३९,६१५ कोटी, आयजीएसटी ८४,०९८ कोटी (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या ३८,५९३ कोटी रुपयांसह) आणि सेस १२,८३९ कोटींचा होता. उपकरामध्ये वस्तूंच्या आयातीतून मिळालेल्या ९८४ कोटी रुपयांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com