GST : ‘जीएसटी’ संकलन १.८४ लाख कोटींवर; परताव्यानंतर निव्वळ उत्पन्न सुमारे १.६३ लाख कोटी रुपये
Indian Economy : फेब्रुवारी महिन्यात जीएसटी संकलन १.८४ लाख कोटी रुपये झाले असून, मागील वर्षाच्या तुलनेत ९.१% वाढ झाली आहे. परताव्यानंतर निव्वळ उत्पन्न सुमारे १.६३ लाख कोटी रुपये असल्याचे सरकारने जाहीर केले.
नवी दिल्ली : फेब्रुवारी महिन्यात एकूण वस्तू आणि सेवा करसंकलन (जीएसटी) १.८४ लाख कोटी रुपये झाले असून, फेब्रुवारी २०२४ मधील संकलनाच्या तुलनेत त्यात ९.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सरकारने आज ही आकडेवारी जाहीर केली.