Mahila Samman Savings Certificate : तुम्ही महिला सन्मान बचत प्रमाणपत्रात पैसे गुंतवले का ? अधिक माहिती इथे जाणून घ्या...

महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी आणि महिलांना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, भारत सरकारकडून महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) योजना सुरु आहे. 1 एप्रिल 2023 पासून ही योजना सुरू करण्यात आली होती.
Mahila Samman Savings Certificate
Mahila Samman Savings CertificateSakal

Mahila Samman Savings Certificate : महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी आणि महिलांना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, भारत सरकारकडून महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) योजना सुरु आहे. 1 एप्रिल 2023 पासून ही योजना सुरू करण्यात आली होती.

या योजनेत जास्तीत जास्त दोन वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. यामध्ये महिला 1,000 ते 2,00,000 रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. सध्या 7.5 टक्के दराने व्याज दिले जात आहे. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला ही संधी 31 मार्च 2025 पर्यंत आहे. याचा अर्थ, जर तुम्ही खाते उघडले आणि गुंतवणूक केली तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

फायदे

- महिला सन्मान बचत पत्र योजना ही मुदत ठेव (Fixed Deposite) योजनेसारखी आहे. ही वन टाइम डेपॉझिट स्‍कीम आहे.

- महिला सन्मान बचत पत्र योजनेचे व्याजदर इतर लहान बचत योजनांपेक्षा चांगले आहेत.

- भारतात चालू असलेल्या सर्व लहान बचत योजनांसाठी नवीन व्याजदर प्रत्येक तिमाहीपूर्वी जाहीर केले जातात, पण महिला सन्मान बचत पत्रावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. यामध्ये तुम्हाला गॅरंटीड 7.5 टक्के परतावा मिळतो.

- या योजनेत तुमचा फंड दोन वर्षांनीच मॅच्युअर होतो. गरज पडल्यास, तुम्ही आंशिक पैसे काढू शकता.

- या योजनेसाठी वयाचे कोणतेही बंधन नाही, ही योजना कोणत्याही वयोगटातील मुलगी किंवा महिलेच्या नावावर गुंतवली जाऊ शकते.

अशा प्रकारे उघडा

तुम्हालाही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकता. अल्पवयीन मुलीच्या नावाने पालक खाते उघडता येते. खाते उघडताना, तुम्हाला आधार कार्ड,

पॅन कार्ड आणि फोटोसह केवायसी कागदपत्रांची आवश्यकता असेल. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला आंशिक पैसे काढण्याची परवानगी मिळते. अशा परिस्थितीत तुम्ही जमा केलेल्या रकमेपैकी 40 टक्के रक्कम काढू शकता. म्हणजेच तुम्ही 2 लाख रुपये जमा केले असतील तर एक वर्षानंतर तुम्ही 80 हजार रुपये काढू शकता.

महिलांनी या योजनेत 50,000 रुपये गुंतवले, तर त्यांना दोन वर्षांत 8011 रुपये व्याज म्हणून मिळतील आणि अशा प्रकारे, एकूण 58,011 रुपये मॅच्युरिटीवर मिळतील. तुम्ही 1,00,000 रुपये गुंतवल्यास, तुम्हाला 1,16,022 रुपये मॅच्युरिटीच्या वेळी 7.5 टक्के व्याजदराने मिळतील.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com