HDFC Bank : एचडीएफसी बँक नफ्यात; डिसेंबर तिमाहीत १६,३७२ कोटींचा निव्वळ नफा

बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न डिसेंबर तिमाहीत २८,४७१ कोटी रुपये असून, वार्षिक तुलनेत त्यात २४ टक्के वाढ झाली आहे.
hdfc bank make profit of 16372 cr finance jumped 33 percent growth
hdfc bank make profit of 16372 cr finance jumped 33 percent growth Sakal

मुंबई : एचडीएफसी बँकेला डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत १६,३७२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असून, वार्षिक तुलनेत त्यात ३३ टक्के वाढ झाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या तिमाहीत बँकेला १२,२५९ कोटी रुपये नफा झाला होता.

बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न डिसेंबर तिमाहीत २८,४७१ कोटी रुपये असून, वार्षिक तुलनेत त्यात २४ टक्के वाढ झाली आहे. एचडीएफसी बँकेच्या शेअरची किंमत गेल्या तीन महिन्यांत नऊ टक्क्यांहून अधिक आणि एका वर्षात केवळ ५.५ टक्क्यांहून अधिक वाढली आहे. तीन महिन्यांत निफ्टी ५० च्या १२ टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत त्यात एका वर्षात २३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

डिसेंबर तिमाहीतील तरतुदी एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीतील २,८०६ कोटींवरून ४,२१७ कोटींवर पोहोचल्या आहेत आणि सप्टेंबर तिमाहीत त्या २,९०४ कोटी रुपये होत्या. बँकेच्या एकूण थकीत कर्जांचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) डिसेंबर तिमाहीअखेर १.२६ टक्के होते.

एका वर्षापूर्वी याच तिमाही कालावधीत ते १.२३ टक्के होते आणि आधीच्या तिमाहीत १.३४ टक्के होते. बँकेचा निव्वळ एनपीए प्रमाण डिसेंबर अखेरीस ०.३१ टक्के होते, एका वर्षापूर्वी याच तिमाहीत ते ०.३३ टक्के होते, तर याआधीच्य तिमाहीत ०.३५ टक्के होते. डिसेंबर अखेरीस बँकेच्या एकूण ठेवी जवळपास २८ टक्क्यांनी वाढून २२.१४ लाख कोटी रुपयांच्या झाल्या आहेत,

तर चालू खाते बचत खाते ठेवी ९.५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. मुदत ठेवींमध्ये ४२ टक्के वाढ झाली आहे. बँकेने डिसेंबरअखेर २४.६९ लाख कोटी रुपयांची कर्जे वितरीत केली असून, मागील वर्षीच्या याच कालावधीतील कर्जांच्या तुलनेत त्यात ६२ टक्के वाढ झाली आहे. गेल्या तिमाहीत देशांतर्गत किरकोळ कर्जात दुप्पट, तर व्यावसायिक आणि ग्रामीण कर्जांमध्ये ३१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बँकेची भांडवल पर्याप्तताही उत्तम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com