Hiring in India : नव्या वर्षात बंपर भरती करण्यासाठी देशातील कंपन्या सज्ज; कोणत्या क्षेत्रात असणार सर्वाधिक रोजगार?

India Jobs in 2024 : मार्च 2024 पर्यंत देशात सतत हायरिंग सुरू राहील असंही या सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे.
Hiring in India
Hiring in IndiaeSakal
Updated on

Job Hiring in India 2024 : कोरोनातून उभारी घेत देश सध्या मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे. शेअर मार्केट देखील दिवसेंदिवस नवे उच्चांक गाठत आहे. देशाच्या जीडीपीबाबत देखील आंतरराष्ट्रीय संस्था चांगले अंदाज वर्तवत आहेत. या सगळ्या सकारात्मक परिस्थितीमुळे देशातील कंपन्या आता पुन्हा एकदा बंपर भरती करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

पुढील तीन महिन्यांमध्ये देशातील सुमारे 37 टक्के कंपन्या भरती करणार आहेत, असं एका सर्व्हेमधून स्पष्ट झालं आहे. यातील सर्वात जास्त नोकऱ्या फायनान्स आणि रिअल इस्टेट क्षेत्रात उपलब्ध होतील. तसंच मार्च 2024 पर्यंत देशात सतत हायरिंग सुरू राहील असंही या सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे.

जगात सर्वाधिक हायरिंग

एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार, देशात नोकरी देण्यासाठी सज्ज असणाऱ्या कंपन्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. यासोबतच जगभरातील कंपन्यांच्या तुलनेत भारतात यावर्षी सर्वाधिक हायरिंग होणार असल्याचा अंदाजही या सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे.

Hiring in India
सरकारचा मोठा निर्णय! 'या' क्षेत्रात उपलब्ध होणार 50 हजार नोकऱ्या, देशात येणार मोठी गुंतवणूक

रोजगार निर्मितीच्या बाबतीत भारत आणि नेदर्लँड्स सर्वात पुढे आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कोस्टारिका आणि अमेरिकेचा नंबर लागतो. सर्वाधिक नोकऱ्या फायनान्स आणि रिअल इस्टेट क्षेत्रात निर्माण होणार असून, त्याखालोखाल आयटी, कंझ्यूमर गुड्स आणि सर्व्हिसेस सेक्टरचा क्रमांक लागतो. एनर्जी किंवा युटिलिटी सेक्टरमध्ये जास्त नोकऱ्या तयार होण्याची शक्यता नसल्याचं या सर्वेक्षणात म्हटलं आहे.

मॅनपॉवर ग्रुप एम्प्लॉयमेंट आउटलुक या सर्व्हेमधून ही गोष्ट उघड झाली आहे. या सर्व्हेमध्ये विविध क्षेत्रांमधील सुमारे 3,100 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यातील 37 टक्के कंपन्यांनी हायरिंगची तयारी सुरू केल्याचं म्हटलं आहे. भारताचा नेट एम्प्लॉयमेंट आउटलुक (NEO) हादेखील जगात सर्वाधिक (41 टक्के) असल्याचं यात स्पष्ट झालं आहे.

Hiring in India
Job Scam : ऑनलाईन जॉब स्कॅममधून कशी होते फसवणूक? गृह मंत्रालयाने दिली सविस्तर माहिती..

नोकरी देणाऱ्या कंपन्या वाढल्या

या सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे, की लेऑफ करण्याच्या विचारात असणाऱ्या कंपन्यांच्या तुलनेत नोकरी देण्याचा विचार करणाऱ्या कंपन्या अधिक आहेत. मॅनपॉवर ग्रुपचे एमडी संदीप गुलाटी यांच्यामते स्थानिक मागणी वाढत आहे. परदेशी गुंतवणूक भारतात येत आहे, आणि राजकीय स्थैर्य निर्माण होत आहे. त्यामुळे भारताच्या प्रगतीचं स्वप्न आता सत्यात उतरत आहे, असंही संदीप म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com