Honda Motorcycles and Scooters : ‘होंडा’चा सहा कोटींचा टप्पा पार ; देशांतर्गत बाजारपेठेत वाहनविक्रीत विक्रमी कामगिरी

होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय) कंपनीने देशांतर्गत बाजारपेठेत सहा कोटी वाहनविक्रीचा विक्रमी टप्पा पार करून ऐतिहासिक कामगिरी केली
Honda Motorcycles and Scooters
Honda Motorcycles and Scooterssakal

गुरुग्राम : होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय) कंपनीने देशांतर्गत बाजारपेठेत सहा कोटी वाहनविक्रीचा विक्रमी टप्पा पार करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कंपनीने २००१ मध्ये आपली पहिली दुचाकी अ‍ॅक्टिव्हासह भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला.

होंडा’च्या या अॅक्टिव्हा ब्रँडने आतापर्यंत नवनवे विक्रम नोंदवले आहेत. आजही ती देशातील सर्वांत लोकप्रिय दुचाकी आहे. स्थापनेपासून होंडा नाविन्य, दर्जा आणि ग्राहकांना समाधान देण्याच्या बाबतीत आघाडीवर असून भारतीय ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने जागतिक दर्जाची उत्पादने पुरवत आहे.

जून २००१ पासून पहिले एक कोटी ग्राहक मिळवण्यासाठी कंपनीला ११ वर्षे लागली, मात्र त्यानंतर वेग तिप्पट झाला आणि कंपनीने दोन कोटींचा टप्पा केवळ तीन वर्षांत पार केला. तीन कोटींचा टप्पा एप्रिल २०१७ मध्ये आणि स्थापनेपासून १६ वर्षांत पूर्ण केला. पुढील तीन कोटी ग्राहक केवळ सात वर्षांत होंडापरिवारात सामील झाले आणि मार्च २०२४ मध्ये देशांर्तंगत विक्रीचा सहा कोटींचा टप्पा गाठला गेला. या विक्रमी कामगिरीमध्ये अ‍ॅक्टिव्हा आणि द शाइन मोटरसायकल या उत्पादनांचा महत्त्वाचा वाटा आहे.

Honda Motorcycles and Scooters
Muthoot Finance : देशातील विश्वासार्ह ब्रँडमध्ये ‘मुथूट फायनान्स’ अव्वल ; सलग आठव्या वर्षी स्थान कायम

या ऐतिहासिक कामगिरीविषयी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी त्सुत्सुमु ओतानी म्हणाले, ‘‘होंडाच्या परिवारामध्ये आता सहा कोटी ग्राहकांचा समावेश झाला आहे. विक्रीचा हा टप्पा भारतीय ग्राहकांच्या होंडा ब्रँडवर असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. आम्हाला या कामगिरीचा अतिशय अभिमान वाटतो आणि ग्राहकांच्या अपेक्षा भरभरून पूर्ण करण्यासाठी व भारतीय दुचाकी क्षेत्राच्या विकासासाठी आम्ही बांधील आहोत.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com