मुंबई : डिजिटल अर्थव्यवस्थेच्या या युगात काही अर्जावर नुसते क्लिक केले की सहजपणे कर्ज मिळून जाते. कर्ज मिळणे आता अत्यंत सोपे झाल्यामुळे आपल्या इच्छा व गरजा पूर्ण करण्याची एक अचाट शक्ती सर्वसामान्यांच्या हाती लागली आहे. .मात्र या सुलभ कर्जासोबत कर्जफेडीची एक अंगभूत जबाबदारी नकळत अंगावर येत असते. ही जबाबदारी पार पाडण्यात गफलत झाली तर कर्ज घेणारी व्यक्ती कर्जफेडीसाठी आणखी कर्ज घेते. ते कर्ज फेडण्यासाठी नंतर पुन्हा कर्ज घेते. अशा कर्जाच्या चक्रात अडकते.आता हे वेगळे सांगण्याची गरज नाही की, कर्ज मिळवणे अत्यंत सुलभ झालेल्या या काळात डेट ट्रॅपमुळे कर्जदार व्यक्तीचे आर्थिक स्थैर्य व एकंदर सुखशांती धोक्यात येउ शकते. कारण एकदा का या डेट ट्रॅपमध्ये अडकले गेले की आपल्या जीवनशैलीत अमूलाग्र बदल अथवा मोठा आर्थिक हस्तक्षेप केल्याविना यातून सुटका होणे कठीण असते..डेट ट्रॅप म्हणजे नक्की काय?अत्यंत उच्च् व्याजदरामुळे जेव्हा कर्जाची मूळ रक्कम फेडणे कठीण अथवा अशक्य होते यालाच डेट ट्रॅप असे म्हणतात. कर्जदाराची कर्जफेड करण्याची असमर्थता त्याला आणखी कर्ज घेण्यास भाग पाडते व असा चक्रव्यूह भेदणे फारच कठीण असते. बहुतांश लोक याच्या दीर्घकालीन दुष्परिणामांची कल्पनाच न आल्यामुळे या चक्रव्यूहात आपसूक अडकले जातात. म्हणून एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या परतफेडीच्या क्षमतेपलीकडे कर्ज घेते तेव्हा ती अशा डेट ट्रॅपमध्ये ओढली जाते. शेवटी अशा व्यक्ती आपल्या आर्थिक व्यवहारांचे प्रभावी व्यवस्थापन करु शकत नाहीत. यामुळे त्यांच्यावर आर्थिक जबाबदाऱ्या निभावून नेण्यासाठी अधिक कर्ज घेण्याची पाळी येते..डेट ट्रॅपमध्ये कोण अडकते?कर्जाची किमान रक्कम फेडण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर केल्यास चक्रवाढ व्याज लागू होते. गरज नसलेल्या वस्तूंवर जेव्हा अवास्तव खर्च होतो किंवा इच्छा झाली म्हणून खरेदी केली जाते, व भविष्यातील आणिबाणीच्या अनाहुत प्रासंगिक खर्चाकडे डोळेझाक होते अशा वेळी अशी व्यक्ती कर्जाच्या विळख्यात अथवा डेट ट्रॅपमध्ये अडकली जाते..डेथ ट्रॅपमधून बाहेर पडण्याची पहिली पायरी कोणती?अंगावर असलेले कर्ज फेडण्यासाठी जेव्हा नव्या कर्जाचा आसरा घ्यावा लागतो तेव्हा विनाशकारी डेट ट्रॅपची धोक्याची चिन्हे मिळत असतात. तेव्हा ही चिन्हे लवकर जाणून घेणे हीच कर्जाच्या विळख्यातून सुटका करुन घेण्याची पहिली पायरी ठरते.कर्जाचा विळखा आपल्या आर्थिक व वैयक्तिक जीवनावर दीर्घकालीन दुष्परिणाम घडवून आणत असतो. कर्जदार कर्जाचे मासिक हप्ते चुकवत असल्यामुळे त्याचे पत मानांकन म्हणजे क्रेडीट स्कोअर घटत असतो. चिंतेमुळे मानसिक आरोग्य धोक्यात येत असते. यातून वैफल्यावस्थेकडे ओढले जाण्याची शक्यता असते. अचानक अंगावर आलेले खर्च भागवण्यात असमर्थता येते. परिणामी मित्र व कुटुंबियांसोबत अशा व्यक्तींचे संबंध बिघडू लागतात..डेट ट्रॅप टाळण्यासाठी काय करावे?सर्वप्रथम अविचारी कर्ज टाळावे. अकस्मात खर्चासाठी निधि तयार करावा. कर्ज फेडीला प्राधान्य द्यावे. कर्ज घेताना विचारपूर्वक कमीत कमी व्याजदर असलेले कर्ज घ्यावे. तसेच कर्ज आरबीआय मान्यताप्राप्त संस्थांकडूनच घ्यावे..चुकून माकून एखादी व्यक्ती डेट ट्रॅपमध्ये अडकलीच तर त्या व्यक्तीने त्वरित नवे कर्ज घेणे थांबवावे. सर्व प्रकारची कर्जे एकाच किमान व्याजदराच्या कर्जाखाली आणावित. कर्जदत्यासोबत कर्जाची पुनर्रचना करण्याबाबत वाटाघाटी कराव्यात आणि हप्ता कमी करुन घ्यावा. तसेच आपल्या नियोजनशून्य खर्चाला आळा घालून काटकसर करावी.अशा प्रकारे अंगावरील कर्जाचे अत्यंत कार्यक्षमतेने व्यवस्थापन करणे हीच निरोगी आर्थिक आरोग्याची गुरुकिल्ली आहे. वैयक्तिक व आर्थिक उद्दीष्टे साध्य करण्याचे कर्ज हेच मौलिक साधन असले तरी त्याचे ढिसाळ व्यवस्थापन व अयोग्य कर्जदात्याकडून कर्ज घेण्याची चूक एखाद्याला आर्थिक खड्यात ढकलू शकते. थोडासा सावधपणा व प्रयत्न आपल्याला या कर्जाच्या विळख्यापासून दूर ठेवू शकतात व आपले आर्थिक भविष्य सुरक्षित राखू शकतात..कर्ज घेताना ते पारदर्शक व प्रामाणिक कर्जदात्याकडून घेणे ही अत्यंत महत्वाची व आवश्यक बाब आहे. त्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेची मान्यता असलेल्या कर्जदात्यांकडूनच कर्ज घ्यावे. जे कर्जदाते आपल्या कर्जफेडीच्या क्षमतेपेक्षा अधिक कर्ज देत असतील तर अशा कर्जदात्यांपासून दोन हात दूरच रहावे. अशा कर्जदात्यांकडून कर्ज घेतल्यास पुढे त्यांच्या अनैतिक कारवायांना सामोरे जावे लागते. म्हणूनच कर्जाच्या विळख्यात अडकले जाण्यापेक्षा कर्ज नाकारले गेले तरी बेहत्तर.अत्यंत हुशारीने व तारतम्याने आपले अर्थव्यवहार हाताळल्यास, अकस्मात खर्चांसाठी नियोजन केल्यास तसेच कसे व कुणाकडून कर्ज घ्यावे याबाबत सावध राहिल्यास डेट ट्रॅप पासून सुटका होईल व जीवनात आर्थिक स्थैर्य नांदू लागेल.(लेखक कृष्ण कन्हैया म्युच्युअल फंडांवर कर्ज देणाऱ्या मिरे ऍसेट मॅनेजमेंट सर्विसेस लिमिटेड या एनबीएफसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.