If income tax payers revert to old income tax system before last due date for filing tax returns, they have to file New Form 10-IEA
If income tax payers revert to old income tax system before last due date for filing tax returns, they have to file New Form 10-IEAsakal

नवा फॉर्म ‘१०-आयइए’

प्राप्तिकर करदाते करविवरणपत्र भरण्याच्या शेवटच्या देय तारखेपूर्वी जुनी प्राप्तिकर करप्रणालीच पुन्हा स्वीकारणार असतील, तर त्यांना एक नवा फॉर्म भरावा लागेल.

प्राप्तिकर करदाते करविवरणपत्र भरण्याच्या शेवटच्या देय तारखेपूर्वी जुनी प्राप्तिकर करप्रणालीच पुन्हा स्वीकारणार असतील, तर त्यांना एक नवा फॉर्म भरावा लागेल. हा फॉर्म प्राप्तिकर विभागाने अधिसूचितदेखील केला आहे. हा फॉर्म भरला नाही, तर जुन्या करप्रणाली अंतर्गत कर भरता येणार नाही. या खेरीज नव्या करप्रणाली अंतर्गत अशी परवानगी न देण्याच्या काही तरतुदीदेखील करविभागाने स्पष्ट केल्या आहेत.

जुन्या करप्रणालीमध्ये उपलब्ध असलेल्या विविध सवलती, वजावटी, कर माफी, नवीन करप्रणालीत काही बाबी वगळता उपलब्ध नाहीत. तथापि, जुन्या करप्रणालीच्या तुलनेत प्राप्तिकराचे उत्पन्नावर निर्धारित केलेले कराचे दर नव्या करप्रणालीमध्ये बरेच कमी आहेत. जुन्या करप्रणालीमध्ये कराचे दर तीन गटात विभागण्यात आले आहेत, तर नव्या करप्रणालीमध्ये सहा गट आहेत.

हे गट करदात्याच्या सोयीचे व फायद्याचे आहेत. आकारणी वर्ष २०२१-२२ पासून लागू करण्यात आलेल्या या योजनेत आकारणी वर्ष २०२४-२५ पासून नवी करप्रणाली निवडीचा प्रथम पर्याय (डिफॉल्ट) बनवून त्यात सुधारणा करण्यात आली आहे. तथापि, करदात्यांना जुनी करप्रणालीच सुरू ठेवण्याची इच्छा असेल वा फायदेशीर असेल, तर त्यासाठी त्यांनी नवा ‘फॉर्म १०-आयइए’ भरणे आवश्यक आहे. याबाबत २१ जून २०२३ रोजी अधिसूचना काढण्यात आली आहे.

‘फॉर्म १०-आयइए’मधील आवश्‍यक तपशील

हा नवा ‘फॉर्म १०-आयइए’ अगदी सुटसुटीत असून, भरण्यास सोपा आहे. त्यात करदात्याचे नाव, त्याचा पॅन, करदात्याने स्वीकारलेली करप्रणाली, कोणत्या आकारणी वर्षासाठी करप्रणालीबाबत बदल अपेक्षित आहे ते वर्ष, करदाता नव्या करप्रणालीमधून बाहेर जात आहे की पुन्हा प्रवेश करीत आहे,

या संबंधी माहिती, करदाता पुन्हा या करप्रणालीमध्ये प्रवेश करीत असेल, तर पूर्वी स्वीकारलेले वर्षनिहाय पर्याय विशद करायचे आहेत. ‘कलम ८०एलए(१ए)’ संदर्भित आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमध्ये कोणतेही युनिट आहे की नाही याची माहिती, देणे अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त सर्व माहिती योग्य व बरोबर आहे, याची हमीदेखील द्यावी लागते.

हा फॉर्म कोणासाठी

कोणतेही व्यावसायिक उत्पन्न नसलेले वैयक्तिक करदाते विवरणपत्रात जुन्या करप्रणालीची निवड करू शकतात आणि त्यांना ‘फॉर्म १० आयइए’ दाखल करण्याची आवश्यकता नाही. हा फॉर्म व्यावसायिक उत्पन्न असणाऱ्या करदात्यांनी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याच्या नियोजित तारखेपूर्वीच भरणे आवश्यक आहे,

आणि करदाते (व्यवसाय उत्पन्न नसलेले) जुन्या करप्रणालीची निवड करू शकतात, ते देय तारखेच्या आधी प्राप्तिकर विवरण पत्र भरत असतील तर! त्यानुसार, करदात्याने उशीरा प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केले आणि त्याने ‘फॉर्म १० आयइए’ भरला नसेल, तर त्याला नव्या करप्रणालीतच कर भरण्यासाठी सांगितले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com