GDP Growth: भारताची अर्थव्यवस्था वेगाने धावणार! २०२६-२०२७ मध्ये GDP वाढ ७ टक्के राहण्याचा IMFचा अंदाज

IMF Predicts 7% GDP Growth for India in 2026 and 2027 : भारताचा जीडीपी विकासदर २०२६ आणि २०२७ मध्ये ७ टक्के राहण्याचा आयएमएफचा अंदाज; जागतिक बँक, मूडीज आणि फिचकडूनही वाढीच्या अंदाजात सुधारणा.
GDP Growth

IMF India GDP Growth

esakal

Updated on: 

GDP Forecast: जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता, वाढत्या महागाईचा दबाव आणि ऊर्जा पुरवठ्यातील व्यत्यय यांसारखी आव्हाने कायम असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ मजबूत राहण्याची अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) २०२६ आणि २०२७ या दोन्ही वर्षांसाठी भारताचा सकल देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) विकासदर ७ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याउलट, जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर २०२६ मध्ये ३.१ टक्के आणि २०२७ मध्ये ३.४ टक्के राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताचा अपेक्षित आर्थिक विकासदर जागतिक सरासरीच्या दुप्पटीहून अधिक असल्याचे स्पष्ट होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com