In America and Britain citizen 2 74 lakh crore remittance in india finance marathi news
In America and Britain citizen 2 74 lakh crore remittance in india finance marathi newsSakal

देशात २.७४ लाख कोटी रुपयांचा रेमिटन्स; अमेरिकेतून १.९१ लाख कोटी, तर ब्रिटनमधून ८३ हजार कोटी

अमेरिका व ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी आपल्या कुटुंबीयांना गेल्या वर्षी २.७४ लाख कोटी रुपये (रेमिटन्स) भारतात पाठवले
Published on

नवी दिल्ली : अमेरिका व ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी आपल्या कुटुंबीयांना गेल्या वर्षी २.७४ लाख कोटी रुपये (रेमिटन्स) भारतात पाठवले आहेत. अमेरिकेतून १.९१ लाख कोटी रुपये, तर ब्रिटनमधून ८३ हजार कोटी रुपये पाठविण्यात आले आहेत. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, आगामी पाच वर्षांत दोन्ही देशांतून भारतात पाठवली जाणारी रक्कम दुप्पट होईल.

याबाबतीत अमेरिका-ब्रिटनने अरब देशांना मागे टाकले आहे. गेल्या पाच वर्षांत दुबई, संयुक्त अरब अमिरात, कुवेत, ओमान, कतार या अरब देशांतून भारतात येणारा पैसा घटला असून, तो २८ टक्क्यांवरून २६ टक्क्यांवर आला आहे, तर याउलट अमेरिका-ब्रिटनमधून येणाऱ्या पैशात वार्षिक १० टक्के वाढ झाली असून, याचे प्रमाण ३६ टक्क्यांवर गेले आहे.

अरब देशांतून केवळ २.३३ लाख कोटीच भारतात आले आहेत. उच्च शिक्षणासाठी अमेरिका व ब्रिटनला जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत गेल्या पाच वर्षांत १२ टक्के वाढ झाली असून, बहुतांश लोक उच्च कौशल्याची गरज असलेल्या व्यवसायांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचे उत्पन्न मोठे आहे. अशा व्यावसायिकांपैकी ४८ टक्के अमेरिका-ब्रिटनमध्ये आहेत.

पाच अरब देशांत मात्र, कामगार आणि मध्यम कौशल्य असणारे लोक अधिक आहेत. अमेरिकेतील ४३ टक्के भारतीय उच्चशिक्षित असून, येथील भारतीय कुटुंबांचे सरासरी उत्पन्न सुमारे एक कोटी रुपये आहे. तर सामान्य अमेरिकी कुटुंबाचे ५८ लाख रुपये आहे, तर ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीय कुटुंबांचे सरासरी उत्पन्न सुमारे ५० लाख रुपये असून इंग्रजी कुटुंबांचे ४८ लाख रुपये आहे. अरब देशांतून गेल्या पाच वर्षांत रेमिटन्स २६ टक्के घटला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com