
थोडक्यात:
केंद्र सरकारचे नवे प्राप्तिकर विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून कायदा अधिक सुटसुटीत होणार आहे.
SIMPLE पाच तत्त्वांवर आधारित विधेयकामुळे कररचना सोपी, स्पष्ट आणि व्यावहारिक बनली आहे.
वैयक्तिक करदाते आणि MSME उद्योजकांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
केंद्र सरकारने सादर केलेले बहुचर्चित नवे प्राप्तिकर विधेयक आज लोकसभेत मंजूर झाले. यामुळे हा कायदा आणखी सुटसुटीत होणार आहे. ‘सुव्यवस्थित रचना आणि भाषा; एकात्मिक आणि संक्षिप्त; किमान खटले; व्यावहारिक आणि पारदर्शक; शिका आणि जुळवून घ्या आणि कार्यक्षम करसुधारणा अशा (SIMPLE) पाच तत्त्वांवर आधारित नवे प्राप्तिकर विधेयक अधिक सुलभ आणि सुटसुटीत आहे. त्यामुळे सहा दशके जुनी कररचना अधिक सुलभ झाली असून, वैयक्तिक करदात्यांना आणि छोट्या उद्योजकांना (एमएसएमई) दिलासा मिळाला आहे.