‘इन्कम टॅक्स रिटर्न’बाबत बोलू काही...

एका कंपनीमध्ये काम करणारे दोन मित्र रमेश (ज्याला ‘इन्कम टॅक्स रिटर्न’संदर्भात जास्त माहिती नाही) आणि सुरेश (जो ‘इन्कम टॅक्स रिटर्न’संदर्भात जागरूक आहे) या दोघांमधील संवाद...
income tax return awareness and its importance
income tax return awareness and its importanceSakal

- अनिरुद्ध राठी

एका कंपनीमध्ये काम करणारे दोन मित्र रमेश (ज्याला ‘इन्कम टॅक्स रिटर्न’संदर्भात जास्त माहिती नाही) आणि सुरेश (जो ‘इन्कम टॅक्स रिटर्न’संदर्भात जागरूक आहे) या दोघांमधील संवाद...

सुरेश: काय रे रमेश? कसा आहेस? तुला आपल्या कंपनीकडून फॉर्म १६ मिळाला ना? मला कालच मिळाला बघ.

रमेश: अरे, काल एचआर (HR) डिपार्टमेंटकडून काहीतरी मेल तर आला आहे... पण जाऊ दे. त्या फॉर्म १६ चं मला काय देणं-घेणं देणं? माझ्या पगारावर जो काही टॅक्स येत आहे; कंपनीने तेवढा टीडीएस केलाच आहे ना...

सुरेश: अरे रमेश, तू काय बोलतोयस ते तुला लक्षात येतंय का...? कंपनीने टीडीएस जरी केला असेल तरी तुला आयटीआर म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न भरणं आवश्यक आहे, हे तुला माहीत आहे ना?

रमेश: काय बोलतोस? म्हणजे कंपल्सरी आहे? अरे, पण सॅलरीवरचा टॅक्स मी भरला आहे ना ऑलरेडी टीडीएसच्या रूपात? मग आता कशाला आयटीआर वगैरे भरत बसू?

सुरेश: रमेश, अवघड आहे बाबा तुझं...! अरे, आपल्याला कायद्यानुसार इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणं अनिवार्य आहे. तसंच त्याचे खूप फायदेसुद्धा असतात.

रमेश: काय बोलतोस? इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करायचे फायदेसुद्धा असतात? तर माझ्या प्रिय मित्रा सुरेश, प्लीज मला हे सर्व सविस्तर सांग ना...

सुरेश: हुश्श...! तुझ्यासारखे अनेक करदाते अजूनही आपल्या अवतीभवती आहेत, हे मला कळतंय आणि त्यामुळे या प्रश्नांची सविस्तर उत्तर देण्यासाठी मी ‘सकाळ मनी’ मासिकाच्या ताज्या अंकात साध्या-सोप्या भाषेत लेख लिहिला आहे.

income tax return awareness and its importance
Income Tax Return: पहिल्यांदाच रिटर्न फाइल करणाऱ्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

माझ्याबरोबरच आणखीही बऱ्याच नामवंत सीए आणि करसल्लागारांनी इन्कम टॅक्स रिटर्नच्या विविध पैलूंवर माहितीपूर्ण लेख लिहिले आहेत. त्यामुळे ‘सकाळ मनी’चा हा ताजा अंक आवर्जून घे आणि नीट बारकाईनं वाच. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील...

वरील संवादामधील कित्येक ‘रमेश’ आपल्याकडील असंख्य करदात्यांमध्ये अजूनही आपल्याला दिसून येतात. प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न हा प्रत्येक करदात्यासाठी खूप महत्त्वाचा भाग असतो. पण बरेच जण त्याकडे गांभीर्याने पाहात नाहीत.

त्यामुळे याबाबतीत माहिती असणे सर्वांनाच खूप गरजेचे आहे. असे ‘रिटर्न’ वेळेत दाखल केल्याने, दंड आणि त्राससुद्धा आपण टाळू शकतो; तसेच मानसिक आणि आर्थिक शांतताही मिळते. बघा पटतंय का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com