

Gold demand in India drops by 29% as record prices, inflation and economic uncertainty impact jewellery purchases and gold investments
esakal
सोन्याच्या किमतींनी गाठलेल्या विक्रमी उच्चांकाचा परिणाम आता भारतीय बाजारपेठेतील खरेदीवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. सणासुदीचा काळ आणि लग्नसराई सुरू असतानाही देशातील सोन्याच्या मागणीत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत भारतातील सोन्याची मागणी मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल २९ टक्क्यांनी घसरून १६२.५ टनांवर आली आहे. गेल्या सहा वर्षांतील ही सर्वात कमी मागणी ठरली आहे. जागतिक सुवर्ण परिषदेने (वर्ल्ड गोल्ड कौन्सिल) मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.