
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना यंदाच्या दिवाळीला मोठं गिफ्ट देण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी जीएसटी (GST) सुधारणा आणि कर कपातीच्या माध्यमातून रोजच्या वापरातील वस्तू स्वस्त करण्याचं आश्वासन दिलं. "सामान्य माणसासाठी कर कमी करणं ही काळाची गरज आहे," असं मोदी म्हणाले. या घोषणेने सामान्य नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे.