Gold Purchase : सोनेखरेदीत भारत जगात तिसरा; मे महिन्यात ७२२ कोटींची सोनेखरेदी, स्वित्झर्लंड व चीननंतर क्रमांक

भारताने मे २०२४ मध्ये सुमारे ७२२ कोटी रुपयांचे सोने खरेदी केले असून, स्वित्झर्लंड आणि चीननंतर सर्वाधिक सोनेखरेदी करणारा तो जगातील तिसरा देश ठरला आहे.
Gold Purchase
Gold Purchasesakal

नवी दिल्ली : भारताने मे २०२४ मध्ये सुमारे ७२२ कोटी रुपयांचे सोने खरेदी केले असून, स्वित्झर्लंड आणि चीननंतर सर्वाधिक सोनेखरेदी करणारा तो जगातील तिसरा देश ठरला आहे. स्वित्झर्लंडने सर्वाधिक २,४६१ कोटी रुपयांचे, तर चीनने २,१०९ कोटी रुपयांचे सोने खरेदी केले आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने मे महिन्यात ७२२ कोटी रुपयांचे सोनेखरेदी केले असून, ती जगातील तिसरी सर्वांत मोठी सोनेखरेदीदार होती. गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये भारताने सोन्याचा साठा सुमारे २०४ टनांनी वाढवला आहे. देशातील सोन्याचा साठा मार्च २०१९ मध्ये ६१८.२ टन होता. ३१ मार्च २०२४ रोजी तो ३३ टक्क्यांनी वाढून ८२२.१ टन झाला. या काळात सोन्याच्या किमती सुमारे ७० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे गेल्या महिन्यात जागतिक सोन्याच्या बाजारातील सरासरी दैनंदिन व्यवहार १८ लाख कोटी रुपयांचे झाले होते. एप्रिल २०२४ पेक्षा त्यात १३ टक्क्यांनी घट झाली आहे. मे २०२३ मधील सरासरी १३.६ लाख कोटी रुपयांपेक्षा त्यात ३२.५१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये १२ महिन्यांनंतर निव्वळ गुंतवणूक सुरू झाली. मे महिन्यात जागतिक पातळीवरील गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक वाढल्याने गेल्या १२ महिन्यांपासून सुरू असलेला घसरणीचा कल संपुष्टात आला. युरोप आणि आशियाने सोन्याच्या ईटीएफ प्रवाहात मोठे योगदान दिले, तर अमेरिकेने त्यातून गुंतवणूक काढून घेतली. आवक आणि सोन्याच्या उच्च किमतींमुळे मे महिन्यात गोल्ड ईटीएफच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता २० टक्क्यांनी वाढून १९.५ लाख कोटी रुपयांची(२३४ अब्ज डॉलर) झाली असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

देश सोनेखरेदी(मे) कोटी रुपये

स्वित्झर्लंड : २,४६१

चीन : २,१०९

भारत: ७२२

जर्मनी : ५५६

द. आफ्रिका: ४५९

आयर्लंड : ४५९

जपान : ३७६

फ्रान्स : २४७

तुर्किये : १०७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com