
नवी दिल्ली : भारतातील अग्रगण्य ग्राहकोपयोगी उषा इंटरनॅशनल या कंपनीने आज (ता. १०) उषा एरोलक्सकडून अलेक्झांड्रीन (एचव्हीएलएस) सीलिंग फॅन्स लॉन्च करण्याची घोषणा केली. हे हाय व्हॉल्यूम लो स्पीड पंखे (एचव्हीएलएस) मोठ्या जागेत कार्यक्षमतेने आणि किफायतशीरपणे प्रदान करण्यासाठी अचूकपणे तयार केले आहेत.
उषा ही एचव्हीएलएस श्रेणी स्वीकारणाऱ्या काही ब्रँडपैकी एक आहे. उषा एरोलक्स अलेक्झांड्रीन सीलिंग फॅनमुळे कोणत्याही जागा थंड ठेवण्यासाठी याचा फायदा होणार आहे. फ्रेंच अलेक्झांड्रिनपासून प्रेरित, त्याचे सहा-ब्लेड डिझाइन शैली आणि कार्यक्षमतेबाबत आदर्श आहे. एरोलक्स अलेक्झांड्रीन सीलिंग फॅन ७८", १०२" आणि १२०" अशा तीन स्वीप आकारात येतात.
सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान आणि इको-फ्रेंडली एअर सर्क्युलेटर्सची एकत्रच मिलाफ यामध्ये पाहायला मिळतो. त्यांच्या अति-कार्यक्षम बीएलडीसी मोटर्स आणि ९५ वॉट्स कमी वीज वापरामुळेच फायदेशीर ठरणार आहेत. या पंख्याचे ब्लेड कोणत्याही जागी हवेचा प्रवाह स्थिर ठेवतात, तसेच वर्षभरातील सर्व ऋतूंसाठीही ते परिपूर्ण बनवतात. याव्यतिरिक्त हे पंखे सॉफ्ट पूश बटण रिमोटसह येतात. त्यामुळे हे पंखे खोलीतील कोठूनही नियंत्रित करता येतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.