Business Summit : हे दशक भारताचेच,बाबा कल्याणी ; उत्पादन क्षेत्रातील ‘जीडीपी’ २५ टक्‍क्यांनी वाढेल

पर्यायी इंधन स्रोतांत होणारी वाढ, उद्योगांचे विकेंद्रीकरण, तंत्रज्ञान कुशल मनुष्यबळ, लालफितीच्या कारभाराचा अस्त आणि एआय आधारित बदलांमुळे उत्पादन क्षेत्रासाठी येणार दशक हे भारताचेच असेल, असा विश्वास भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांनी व्यक्त केले.
Business Summit
Business Summitsakal

पुणे : पर्यायी इंधन स्रोतांत होणारी वाढ, उद्योगांचे विकेंद्रीकरण, तंत्रज्ञान कुशल मनुष्यबळ, लालफितीच्या कारभाराचा अस्त आणि एआय आधारित बदलांमुळे उत्पादन क्षेत्रासाठी येणार दशक हे भारताचेच असेल, असा विश्वास भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांनी व्यक्त केले. उत्पादन क्षेत्रातील सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) २५ टक्‍क्यांनी वाढेल, असेही ते म्हणाले.

सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जे. डब्ल्यू. मॅरिएट येथे आयोजित पुणे इंटरनॅशनल बिझनेस समिटमध्ये ते बोलत होते. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए) वतीने ही आंतरराष्ट्रीय उद्योग परिषद आयोजित करण्यात आली आहे. केपीआयटी टेक्नॉलॉजीचे रवी पंडित यांनी बाबा कल्याणी यांच्याशी संवाद साधला. वाहन उद्योगातील सद्यःस्थिती आणि भविष्यातील संधींबद्दल कल्याणी यांनी आपले विचार मांडले.

ते म्हणाले, ‘‘पाश्चिमात्य जगत इंधनाचे पूर्वनियोजन करत आहे. मात्र, भारत अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांच्या माध्यमातून ऊर्जेचे नवीन पर्याय उपलब्ध करत आहे. तसेच देशभरात नवउद्योजकांची एक साखळी उभी राहत असून, येणाऱ्या दशकातील भारताच्या प्रगतीचे हे द्योतक आहे. सध्या जरी आपण उत्पादन क्षेत्राच्या बाबतीत फॉलोअर असलो, तरी कोरोनानंतर ही परिस्थिती आता बदलत आहे.

Business Summit
Pune Corpration : व्यावसायिकांना न्यायालयाचा दणका ; बेकायदा बांधकाम पाडल्याप्रकरणी पालिकेच्या बाजूने निकाल

भविष्यात या क्षेत्राचे आपण नेतृत्व करणार आहोत.’’ संरक्षण क्षेत्रात खासगी उद्योगांचा सहभाग वाढल्याने देश आयात धोरणाकडून आता निर्यात धोरणाकडे वळत आहे, असा अनुभवही कल्याणी यांनी सांगितला. परिषदेचे उद्‍घाटन केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या ध्वनिचित्रफितीने झाली. परिषदेची प्रस्तावना ‘एमसीसीआय’चे महासंचालक प्रशांत गिरबाने यांनी केली. स्वागत अध्यक्ष दीपक करंदीकर यांनी केले. उद्योग क्षेत्रातील दिग्गजांची विविध सत्रे परिषदेत आयोजित करण्यात आली आहे. तसेच सेंटर फॉर एक्सलन्स ऑफ सायबर सिक्युरीटीजचे उद्‍घाटनही परिषदेत झाले.

‘चॅट जीपीटी’मुळे नवरोजगार

कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा ‘चॅट जीपीटी’मुळे नोकऱ्या जाणार नाही तर त्यांचे स्वरूप बदलेल, असे मत रवी चितळे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘इंटरनेटवर असलेल्या माहितीला संकलित आणि मांडण्याचे काम ‘चॅट जीपीटी’ करते. इंटरनेटच्या पलीकडे ते उडी घेऊ शकत नाही. मानवी प्रज्ञा किंवा कल्पनाशक्तीला कधीच पर्याय असणार नाही. उलट कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे काम जलद होईल आणि नवीन क्षेत्रांत संधी उपलब्ध होणार आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com