IT Sector : भारतीय आयटी सेक्टरसाठी 2024 'वॉशआउट' वर्ष, आता 2025 कडे लक्ष केंद्रित करा; जे.पी. मॉर्गन विश्लेषकांचा सल्ला

JP Morgan : काही दिवसांपूर्वीच जेपी मॉर्गनच्या ग्लोबल बाँड इंडेक्समध्ये भारताचा समावेश झाला होता.
IT Sector India
IT Sector IndiaeSakal

भारतातील आयटी सेक्टरसाठी हे आर्थिक वर्ष हलाखीचं ठरणार आहे, असं गृहीत धरण्याचा सल्ला जे.पी. मॉर्गनच्या विश्लेषकांनी दिला आहे. या 'वॉशआउट' वर्षानंतर रिकव्हरीसाठी गुंतवणुकदारांनी 2025 या आर्थिक वर्षाकडे लक्ष केंद्रित करावं असंही त्यांनी म्हटलं आहे.

यासाठी गुंतवणुकदारांनी आगामी दुसऱ्या तिमाहीतील परफॉर्मन्स आणि आयटी कंपन्यांचं भाष्य याकडे लक्ष ठेवावं, आणि त्याचं नीट विश्लेषण करावं असं जे.पी. मॉर्गनच्या विश्लेषकांनी स्पष्ट केलं.

"गेल्या काही महिन्यांमध्ये आयटी सेक्टरमध्ये म्हणावी अशी मागणीच दिसून आलेली नाही. गेल्या तिमाहीइतका सकारात्मक सेटअप दिसत नसल्यामुळे या क्षेत्रात आपण निगेटिव्ह राहिलो आहोत", असं विश्वेषक अंकुर रुद्र आणि भाविक मेहता यांनी स्पष्ट केलं. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

IT Sector India
जेपी मॉर्गनच्या ग्लोबल बाँड इंडेक्समध्ये भारत; भारतीय बाँड मार्केट आणि रुपयावर काय परिणाम होणार?

अमेरिकेतून मागणी नाही

टीसीएस, विप्रो, एचसीएल टेक अशा कित्येक आयटी कंपन्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना याबाबत आधीच कल्पना दिली होती. या कंपन्यांचे बहुतांश क्लाएंट अमेरिका-स्थित आहेत. अमेरिकेतील लोक आयटीवरील आपला खर्च कमी करत आहेत. कित्येक लोक पेमेंट डीले करत आहेत, तर कित्येकांनी आपल्या ऑर्डर्स कॅन्सल केल्या आहेत.

"गुंतवणूकदारांनी 2024 हे आर्थिक वर्ष धोक्याचं आहे हे गृहित धरलं आहे, आणि आपल्या गुंतवणुकीचा परतावा मिळवण्याच्या आशेने 2025 या आर्थिक वर्षाकडे लक्ष केंद्रित केलं आहे." असं विश्लेषकांनी स्पष्ट केलं. गेल्या तीन महिन्यांमध्ये निफ्टी आयटी इंडेक्स ही ब्लू चिप निफ्टी 50 पेक्षा अधिक चांगली कामगिरी करत असल्याचंही विश्लेषकांनी सांगितलं.

IT Sector India
TCS Company: टीसीएस कंपनीचा कर्मचाऱ्यांना झटका! 1 ऑक्टोबरपासून होणार...

रुद्र आणि मेहता असंही म्हणाले, की अलीकडेच विविध बिझनेस एक्झिक्युटिव्ह सोबत झालेल्या बैठकीत कोणताही आशावाद दिसून आला नाही. 2025 या आर्थिक वर्षात लार्ज-कॅप आयटी कंपन्यांची वाढ एक-अंकी होण्याची शक्यता जे.पी. मॉर्गनने व्यक्त केली आहे. तर बाजाराची अपेक्षा दोन-अंकी वाढीची आहे. दरम्यान, जे.पी. मॉर्गनने इन्फोसिसला 'अंडरवेट' कॅटेगरीमधून काढून, 'न्यूट्रल' कॅटेगरीमध्ये ठेवलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com