Indraprastha Gas Ltd Dividend : इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडकडून डिव्हिडेंडची घोषणा, मार्च तिमाहीत नफ्यात वाढ...

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने (Indraprastha Gas) नुकताच लाभांश (Dividend) जाहीर केला आहे.
Indraprastha Gas Limited announces dividend increases profit in March quarter
Indraprastha Gas Limited announces dividend increases profit in March quarterSakal

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने (Indraprastha Gas) नुकताच लाभांश (Dividend) जाहीर केला आहे. कंपनीच्या बोर्डाने 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या वर्षासाठी प्रति शेअर 5 रुपये अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे.

मात्र, त्यासाठी आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत शेअरहोल्डर्सच्या मंजुरीची आवश्यकता असेल. कंपनीने नियामक फायलिंगमध्ये ही माहिती दिली आहे. यासोबतच इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने तिमाही निकाल जाहीर केले आहेत. सध्या हे शेअर्स 437.20 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने 14 सप्टेंबर 2004 पासून 24 वेळा लाभांश जाहीर केला आहे. कंपनीने गेल्या 12 महिन्यांत प्रति शेअर 4 रुपयांचा इक्विटी लाभांश जाहीर केला आहे. सध्याच्या शेअर किमतीवर, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडचे डिविडेंड यील्ड 0.92% आहे.

चौथ्या तिमाहीत इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडचा एकत्रित निव्वळ नफा 9 टक्क्यांनी वाढला आहे. या कालावधीत कंपनीला 433.29 कोटीचा नफा झाला आहे. सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन कंपनीने एका वर्षापूर्वी 397.51 कोटीचा एकत्रित निव्वळ नफा कमावला होता.

पण, गेल्या डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 475.45 कोटीच्या तुलनेत सुमारे 9 टक्क्यांनी घट झाली आहे. या तिमाहीत कंपनीचा महसूल 3,964.42 कोटी होता, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत नोंदवलेल्या 4,056.44 कोटींपेक्षा कमी आहे.

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडचे मार्केट कॅप 30,604 कोटी आहे. गेल्या महिनाभरात कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांनी घसरले आहेत. मात्र, गेल्या 6 महिन्यांत हा स्टॉक 10 टक्क्यांनी वाढला आहे. या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात हा स्टॉक सुमारे 11 टक्क्यांनी घसरला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com