Inflation: नोव्हेंबरमध्ये महागाई तीन महिन्यांच्या उच्चांकावर; अन्नधान्य, भाजीपाल्याचे दर वाढल्याचा परिणाम

खिशावर वाढता भार : अन्नधान्य, भाजीपाल्याचे दर वाढल्याचा परिणाम
Retail inflation rises to 3-month high
Retail inflation rises to 3-month highSakal

नवी दिल्ली : अन्नधान्यासह भाजीपाला आणि खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्यामुळे नोव्हेंबरमध्ये महागाईदर ५.५५ टक्क्यांवर गेला आहे. हा गेल्या तीन महिन्यांतील उच्चांक आहे. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर ऑक्टोबरमध्ये ४.८७ टक्के आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये ५.८८ टक्के होता,

असे आज जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीवरून समोर आले आहे. ऑगस्टमध्ये महागाईदराने ६.८३ टक्क्यांचा उच्चांक नोंदवला होता. मात्र, त्यानंतर महागाई कमी होत होती, त्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला होता. परंतु, नोव्हेंबरमधील दरवाढीने चिंतेत भर घातली आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, अन्नधान्याचा महागाईदर ऑक्टोबरमधील ६.६१ टक्क्यांवरून नोव्हेंबरमध्ये ८.७ टक्क्यांपर्यंत वाढला, वर्षभरापूर्वी नोव्हेंबर महिन्यात हा दर ४.६७ टक्के होता.

Retail inflation rises to 3-month high
Inflation : व्याप्त काश्‍मीरात वीजबिलावरून असंतोष

डाळींच्या महागाईचा दर २०.२३ टक्के, भाज्या १७.७ टक्के आणि फळे १०.९५ टक्के आहे. ग्रामीण भागात महागाई ५.८५ टक्‍क्‍यांवर होती, तर शहरी भागात ५.२६ टक्‍क्‍यांवर होती आणि नोव्हेंबरमध्‍ये राष्‍ट्रीय सरासरी ५.५५ टक्‍क्‍यांवर पोहोचली आहे, असेही या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या पतधोरणात, रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर ५.४ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता. तिसऱ्या तिमाहीत हा दर ५.६ टक्के आणि शेवटच्या तिमाहीत ५.२ टक्के राहील, असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

Retail inflation rises to 3-month high
Wedding Planning Inflation : सोने-चांदी महागल्याचा परिणाम, विवाहाचे बजेट बिघडले

राज्यांमध्ये ओडिशामधील महागाईचा दर सर्वाधिक ७.६५ टक्के नोंदविला गेला असून, बिहार, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, पंजाब, तेलंगणा आणि राजस्थान या राज्यांमध्येही महागाईदर सहा टक्क्यांहून अधिक आहे. दिल्लीत मात्र, सर्वांत कमी ३.१ टक्का महागाईदर नोंदविला गेला आहे.

नोव्हेंबरमध्ये अन्नधान्याच्या महागाईत आठ टक्क्यांची वाढ झाली असून, भाजीपालाही महागला आहे. त्यामुळे महागाईदर वाढीला चालना मिळाली आहे. कोअर सीपीआय आधारित महागाई मात्र ऑक्टोबर २०२३ मधील ४.४ टक्क्यांवरून नोव्हेंबर २०२३ मध्ये ४.२ टक्क्यांवर आली. यातील सातत्यपूर्ण घट सकारात्मक आहे.

- अदिती नायर, मुख्य अर्थतज्ज्ञ, इक्रा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com