व्याजमुक्त गृहकर्ज

आपल्याकडे आपल्याला विविध गरजेनुसार कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. जसे, की गृहकर्ज, वाहनकर्ज, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज आदी. यातील सर्वांत लोकप्रिय गृहकर्ज आहे. बऱ्याच लोकांचा गृहकर्जाचा हप्ता चालू असतो.
Interest free home loan finance assistant home education personal vehicle loan
Interest free home loan finance assistant home education personal vehicle loan Sakal
Updated on

- मकरंद विपट

आपल्याकडे आपल्याला विविध गरजेनुसार कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. जसे, की गृहकर्ज, वाहनकर्ज, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज आदी. यातील सर्वांत लोकप्रिय गृहकर्ज आहे. बऱ्याच लोकांचा गृहकर्जाचा हप्ता चालू असतो.

त्यांनी घेतलेली गृहकर्जाची रक्कम १५ ते २० वर्षांत फेडताना घेतलेल्या मूळ रकमेपेक्षा जास्त व्याज आपण भरतो, याची खंत प्रत्येकाच्या मनात जाणवते. माझ्या आजच्या या लेखातून या कर्जावरील आपण जे व्याज देतो, त्या व्याजातून मुक्ती कशी मिळावावी, हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

असे समजू, की एखाद्या व्यक्तीने ७०,००,००० रुपयांचे गृहकर्ज ८.५ टक्के व्याजदराने २० वर्षांसाठी घेतले आहे. त्या व्यक्तीस ६०,७४८ रुपयांचा मासिक हप्ता येणार आहे. या २० वर्षांच्या कालावधीत ती व्यक्ती एकूण ७५,७९,४३० रुपये इतके व्याज भरणार आहे. मुद्दल आणि व्याज धरून एकूण रक्कम १,४५,७९,४३० रुपये ती व्यक्ती भरणार आहे.

म्हणजे ती व्यक्ती घेतलेल्या कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त व्याज या कर्जाच्या कालावधीत भरणार आहे. आता ही व्याजाची रक्कम जर त्या व्यक्तीला वाचवायची असेल तर त्याने मासिक हप्त्याच्या म्हणजे ६०,००० रुपयांच्या १५ टक्के रकमेची म्हणजे

९,००० रुपयांची म्युच्युअल फंडात ‘एसआयपी’ कर्जाच्या कालावधीएवढीच चालू करावी. या कर्जाच्या कालावधीत तो किती व्याज भरणार आणि त्याला या गुंतवणुकीतून किती फायदा होणार, ते सोबतच्या तक्त्यावरून आपल्याला समजेल.

सोबतच्या तक्त्यावरून आपणास असे कळते, की आपण भरलेल्या व्याजापेक्षा जास्त परतावा आपल्याला केलेल्या गुंतवणुकीतून मिळाला. म्हणजेच गृहकर्जाचे व्याज मोफत? असेही बघण्यात आले आहे, की गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात ४ ते ५ वर्षांपासून नियमित गुंतवणूक करत आहेत आणि आता त्या गुंतवणुकीचे मूल्यांकनही चांगले वाढलेले दिसत आहे आणि त्या गुंतवणूकदारांकडे गृहकर्जसुद्धा आहे.

आता हे लोक म्युच्युअल फंडातील सर्व गुंतवणूक काढून गृजकर्ज फेडतात. पण असे करणे चुकीचे ठरते. कारण आपण घेतलेले गृहकर्ज हे कमी व्याजदराने असते आणि आपण केलेल्या गुंतवणुकीतून आपल्याला जास्त परतावा मिळत असतो.

ती गुंतवणूक आपण मध्येच मोडली किंवा काढली, तर त्यावरील ‘कंपाउंडिंग इफेक्ट’ला आपण मुकतो आणि मग जेवढे व्याज आपण बँकेत भरतो तेवढा परतावा आपल्याला गुंतवणुकीतून मिळत नाही.

शिवाय मोडलेल्या गुंतवणुकीवर मिळालेल्या लाभाच्या एक विशिष्ट मर्यादेनंतर कर बसतो, ते वेगळाच! त्यामुळे म्युच्युअल फंडातून आपली गुंतवणूक विकून गृहकर्ज फेडणे हे फायदेशीर ठरत नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनो वर सांगितलेल्या युक्तीचा नक्की विचार करावा आणि आपल्या गृहकर्जाच्या मासिक हफ्त्याच्या १५ टक्के रकमेची गृहकर्जाच्या कालावधीएवढी गुंतवणूक करावी आणि आपले गृहकर्ज व्याजविरहित करावे.

(डिस्क्लेमरः म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. यासंदर्भात अनुभवी गुंतवणूक सल्लागाराची मदत घेणे हिताचे ठरते.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.