RBI : व्याजदर स्थिर, तरी आलबेल नाही; चलनवाढीची चिंता कायम - शक्तिकांत दास

रिझर्व बँकेने आज पतधोरण समितीच्या द्वैमासिक तीन दिवसीय बैठकीनंतर व्याजदर पुन्हा साडेसहा टक्क्यांवर स्थिर ठेवले.
RBI
RBIEsakal

मुंबई - रिझर्व बँकेने आज पतधोरण समितीच्या द्वैमासिक तीन दिवसीय बैठकीनंतर व्याजदर पुन्हा साडेसहा टक्क्यांवर स्थिर ठेवले. अर्थात व्याजदर स्थिर ठेवले तरी रिझर्व बँकेने अजून चलनवाढीबाबत नरमाईचे धोरण स्वीकारले नाही, तर चलनवाढीची चिंता अजूनही कायम आहे, असेही दास यांनी स्पष्ट केले.

रिझर्व बँकेने आज सलग पाचव्यांदा रेपोरेट स्थिर ठेवला. समितीने आज एकमताने रेपोरेट स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. हा दर यावेळीही स्थिर राहील अशीच सर्वांची अपेक्षा होती. 

मात्र रिझर्व बँकेने आता चलनवाढीची चिंता सोडून देऊन त्याबाबतचे धोरण बदलले असा आजच्या निर्णयाचा अर्थ होत नाही. अद्यापही चलनवाढीची चिंता कायम आहे, असे दास म्हणाले. मात्र कोरोना काळातील कमी व्याजदराची सवलत आता इतक्यात तरी न देण्यावर समितीमधील सर्वांचे एकमत होते. त्यामुळे व्याजदर इतक्यात कमी न करता आहे त्याच पातळीवर ठेवावेत असेही सर्वांनी एकमताने ठरवले.

नुकतीच चलनवाढ थोडी कमी झाली असली तरी अन्नधान्याच्या किमती वाढत असल्याबाबत दास यांनी चिंता व्यक्त केली. येत्या काही महिन्यांत अन्नधान्याच्या किमती अशाच वाढत्या राहतील. त्यामुळे चलनवाढही होऊ शकते असाही समितीचा कल दिसला.

रिझर्व बँकेने चलनवाढ आणि विकास या दोघांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करूनच आजचा निर्णय घेतला आहे. सध्या जगात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा क्रम असल्यामुळे व्याजदर कमी करण्याची घाई नाही, असेही दास यांनी सुचित केले. चलनवाढ चार टक्क्यांवर येण्यास अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे. अर्थात ती एकदाच चार टक्क्यांवर येऊन चालणार नाही, तर ती सतत त्याच पातळीवर सतत राहिली पाहिजे, असेही दास म्हणाले.

इशाराही दिला

अद्यापही सर्वत्र आर्थिक अनिश्चिततेचे वातावरण असल्यामुळे आपण भविष्याबद्दल काहीही मतप्रदर्शन करणार नाही. भविष्य अनिश्चित आहे आणि कोठूनही नवे हादरे बसू शकतात, असेही दास यांनी स्पष्ट केले.

२०२४ साठी सात टक्के जीडीपी वाढ

या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यातील जीडीपी ची वाढ आमच्यासह सर्वांनाच आश्चर्यचकित करून गेली. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातील जीडीपीचा तपशीलही खूपच चांगला आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष २०२४ मध्ये जीडीपीची वाढ सात टक्के राहील, हा अंदाज खूपच योग्य आहे, असे डेप्युटी गव्हर्नर मिखाईल पात्रा म्हणाले. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत भारताच्या जीडीपीची वाढ ७.६ टक्के एवढी राहिली आहे.

बचत खाते व्याजदर निर्णय सर्वस्वी बँकांचा

व्याज दरवाढीच्या तुलनेत बचत खात्यांचे व्याजदर फार वाढले नसल्याबाबत दास म्हणाले की, हा बँकांचा व्यापारी निर्णय आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण आणणे योग्य ठरणार नाही. असे केले तर ते एक पाऊल मागे घेण्यासारखे होईल.

आर्थिकवर्ष २०२४ साठी सीपीआय चलनवाढ ५.४ टक्के राहण्याचा अंदाज

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ चलनवाढ अंदाज ५.६ टक्के जानेवारी ते मार्च २०२४ चलनवाढ ५.२ टक्के एप्रिल ते जून २०२४ चलनवाढ ५.२ टक्के जुलै ते सप्टेंबर २०२४ चलनवाढ ४ टक्के ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ चलनवाढ ४.७ टक्के 

नुकतीच ऑक्टोबर मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) चलनवाढ ४.८ टक्क्यांवर आली होती. मात्र नोव्हेंबर मध्ये चलनवाढीचा दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यावर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे दास म्हणाले.

आर्थिक वर्ष २०२४ साठी जीडीपी वाढ ७ टक्के

या आर्थिक वर्षासाठी जीडीपी दराचा अंदाज ६.५ टक्क्यांवरून ७ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ विकासदर अंदाज ६ टक्क्यांवरून ६.५ टक्क्यांवर नेला

जानेवारी ते मार्च २०२४ विकासदर अंदाज ५.७ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर

एप्रिल ते जून २०२४ विकासदर ६.६ टक्क्यांवरून ६.७ टक्क्यांवर. जुलै ते सप्टेंबर २०२४ जीडीपी वाढ दर ६.५ टक्क्यांवर ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ जीडीपी वाढ ६.४ टक्क्यांवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com