
देशातील आघाडीच्या सहा आयटी निर्यातदार कंपन्यांनी वित्तीय वर्ष FY26 मध्ये सुमारे 82,000 फ्रेशर्स भरती करण्याची योजना आखली आहे.अंदाजानुसार,या कालावधीत 1.5 लाखांहून अधिक नवीन भरती केली जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्लाऊड कंप्युटिंग आणि जनरेटिव्ह AI यांसारख्या तंत्रज्ञानाच्या वाढत्या मागणीमुळे आयटीसेवा कंपन्या आणि जागतिक क्षमतेची केंद्रे (GCCs) मोठ्या प्रमाणावर भरती करण्याच्या तयारीत आहेत. भारतीय युवकांचा कल तांत्रिक आणि आयटी क्षेत्रात वाढलेला पाहून कंपन्यांकडून आशावादी दृष्टिकोन पहायला मिळतो.