
पाणी विकण्याची कल्पना जेव्हा पहिल्यांदा फेलिस बिसलेरी यांनी १९६५ मध्ये मांडली, तेव्हा लोकांना हसू आलं. पाण्यासारखी मुफ्त मिळणारी गोष्ट कोण विकत घेईल? पण या हसण्यामागील भविष्याचा अंदाज फेलिस आणि भारतातील रमेश चौहान यांना होता.
रमेश चौहान यांनी अवघ्या ४ लाखांत बिसलेरी कंपनी विकत घेतली आणि तिला ७,००० कोटींची बनवली. आज या साम्राज्याची कमान त्यांची ३९ वर्षीय मुलगी जयंती चौहान सांभाळत आहे. टाटांसारख्या दिग्गज कंपनीचा ७,००० कोटींचा प्रस्ताव नाकारून तिने बिसलेरीला नव्या उंचीवर नेलं.