Net Profit Growth : किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडने तिसऱ्या तिमाहीच्या निकालांची घोषणा केली असून, कंपनीच्या निव्वळ नफ्यात ४३.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीच्या महसूली उत्पन्नातही १८.६ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
पुणे, प्रतिनिधी : पंप निर्मितीसाठी देशातील अग्रगणी समजल्या जाणाऱ्या किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड या कंपनीने अर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले असून तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीच्या निव्वळ नफ्यामध्ये ४३.८ टक्क्यांची वाढ झाली आहे.