Larsen and Toubro Ltd : एल अँड टीचे शेअर्स धडाम, ब्रोकरेजेसने घटवली टारगेट प्राइस...

एल अँड टी (L&T) शेअर्सवर सध्या विक्रीचा दबाव दिसून येत आहे. मार्च 2024 तिमाही निकालानंतर बाजारासाठी सर्वात मोठी निराशा त्यांच्या मार्जिन गायडन्समुळे झाली आहे.
Larsen and Toubro Ltd
Larsen and Toubro LtdSakal

एल अँड टी (L&T) शेअर्सवर सध्या विक्रीचा दबाव दिसून येत आहे. मार्च 2024 तिमाही निकालानंतर बाजारासाठी सर्वात मोठी निराशा त्यांच्या मार्जिन गायडन्समुळे झाली आहे. यामुळे किमान चार ऍनालिस्ट्सने एल अँड टीमधील गुंतवणुकीचे टारगेट कमी केले आहे. त्यामुळे गुरुवारी शेअर्सना जोरदार तडाखा बसला.

सध्या बीएसईवर हा शेअर 3.52 टक्क्यांच्या घसरणीसह 3362.65 रुपयांवर ट्रेड करत आहे. तरइंट्रा-डेमध्ये तो 5.60 टक्क्यांनी घसरला आणि 3290.00 रुपयांपर्यंत घसरला. ब्रोकरेजच्या ट्रेंडबद्दल बोलताना, 36 पैकी 31 विश्लेषकांनी एल अँड टीचे बाय रेटिंग कायम ठेवले आहे, तिघांनी त्याला होल्ड रेटिंग दिले आहे आणि दोघांनी विक्री रेटिंग दिले आहे.

आर्थिक वर्ष 2025 साठी, कंपनीला 10 टक्के अधिक ऑर्डर मिळतील असा अंदाज आहे. टॉपलाइन ग्रोथ 15 टक्के असू शकते असा विश्वासही व्यक्त केला जात आहे. पण मार्जिन आघाडीवर, कंपनीने ऍनालिस्ट्सच्या अंदाजापेक्षा कमी असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कंपनीच्या मते, एल अँड टीचे मार्जिन आर्थिक वर्ष 2025 मध्ये 8.25 टक्के असू शकते तर ऍनालिस्ट्सचा अंदाज 9 ते 9.5 टक्के होता.

ब्रोकरेज फर्म सीएलएसएने आपले खरेदी रेटिंग कायम ठेवले आहे पण टारगेट 4260 रुपयांवरून 4151 रुपये केले आहे. ब्रोकरेजने ऑर्डर इनफ्लो गायडन्स आणि त्याच्या मजबूत अंमलबजावणी क्षमतेच्या आधारे त्याचे बाय रेटिंग कायम ठेवले आहे. मिडल ईस्टर्न कॅपेक्समध्ये मंदी असूनही एल अँड टीची पाइपलाइन 24% वाढू शकते असे सीएलएसएने म्हटले आहे.

ब्रोकरेज फर्म जेफरीजनेही त्यांचे टारगेट 4135 रुपयांवरून 3970 रुपयांपर्यंत कमी केली आहे पण बाय रेटिंग कायम ठेवली आहे. कंपनीने निश्चित केलेला 15 टक्के महसूल वाढीचा अंदाज आर्थिक वर्ष 2024 मध्ये मिळालेल्या ऑर्डरपेक्षा खूपच कमी असल्याचे ते म्हणाले.

मॉर्गन स्टॅनलीने देखील आपले टारगेट 4,106 रुपयांवरून 3,857 रुपये केले आहे आणि गोल्डमन सॅचने टारगेट 3,900 रुपयांवरून 3,600 रुपये केली आहे. मात्र, दोघांनीही यावर आपला तेजीचा कल कायम ठेवला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com