लाखोंची रक्कम मिळाली परत

खासगी नोकरीतल्या ५५ वर्षे वयाच्या एका व्यक्तीला आपला पॅन कार्ड क्रमांक तातडीने अपडेट करण्याचा मेसेज आला.
money-investment-finance
money-investment-financesakal

शिरीष देशपांडे

सध्या प्राप्तिकर विवरणपत्र भरलेल्या करदात्यांना आपला परतावा मिळण्याची अपेक्षा आहे. अनेकांना प्राप्तिकर विभागाकडून परतावा बँकेत जमा झाल्याचे संदेश मिळाले आहेत, तर काहींना प्रतीक्षा आहे. अशा परिस्थितीत करदात्यांच्या मोबाईलवर प्राप्तिकर खात्याच्या नावाखाली एक बोगस संदेश येत आहे.

त्यात पॅन कार्ड ताडीने अपडेट करण्याची गरज असून, त्यामुळे परतावा देण्यात अडचण येत आहे, असे म्हटले आहे. अशा फसव्या संदेशांना अनेक करदाते बळी पडत आहेत. अशाप्रकारे फसवणूक झाल्यास तातडीने तक्रार नोंदवल्यास पैसे परत मिळू शकतात. याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे अशाप्रकारे फसवणूक झाल्यास तत्काळ तक्रार करा.

money-investment-finance
Pune : कव्वालीचा कार्यक्रम बंद अन् हॉटेलमध्ये तोडफोड

रक्कम परत मिळवण्यात यश

खासगी नोकरीतल्या ५५ वर्षे वयाच्या एका व्यक्तीला आपला पॅन कार्ड क्रमांक तातडीने अपडेट करण्याचा मेसेज आला. त्यातील लिंकवर क्लिक करून या व्यक्तीने, त्यात सांगितलेल्या ठिकाणी पॅन कार्ड नंबर आणि इतर माहिती भरली. त्यानंतर आलेला ओटीपीही शेअर केला आणि त्यानंतर काही वेळातच त्याला बँकेकडून नऊ लाख ९९ हजार रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला.

पैसे गेल्याचा संदेश येताच या व्यक्तीने पुणे सायबर क्राइम विभागाकडे तातडीने तक्रार केली. पोलिसांनी चेन्नईच्या गेमिंग कंपनीत गेलेले हे पैसे तातडीने गोठवून त्यातील नऊ लाख ६० हजार रुपये परत मिळवले. आता हे पैसे गेमिंग कंपनीत कसे गेले, याचा तपास सायबर विभाग करत आहे. कारण कंपनीने त्यांचे बँक खाते चोरट्याने वापरले असल्याचे मान्य केले आहे.

असे घडल्यास काय करावे

वरील घटनेत तातडीने तक्रार केल्यामुळे आणि त्यावर पुणे सायबर क्राइम विभागाने हालचाल केल्याने पैसे परत मिळवण्यात यश आले. त्यामुळे तातडीने तक्रार नोंदवणे आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे असे काही झालेच, तर ताबडतोब https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा आणि त्वरित १९३० या नंबरवर संपर्क साधा. ही यंत्रणा तातडीने योग्य ती कार्यवाही करेल.

ही घ्या काळजी

money-investment-finance
Mumbai Attack: NIAने पकडलेल्या सहाव्या संशयित दहशतवाद्याकडून धक्कादायक खुलासा, मुंबईत करणार होते घातपात

प्राप्तिकर विभाग पॅन कार्ड अपडेटसाठी ‘एसएमएस’द्वारे माहिती मागवत नाही. असा एसएमएस, ई-मेल किंवा फोन आल्यास, त्याला प्रतिसाद देऊ नका. तो नंबर ब्लॉक करा.माहितीच्या नसलेल्या ई-मेल अथवा एसएमएस लिंकवर क्लिक करू नका. कोणत्याही व्यक्तीला बँक खात्याचा तपशील, ओटीपी, पिन, आधार कार्ड, पॅन कार्ड नंबर देऊ नका. गरज पडल्यास बँकेत प्रत्यक्ष जाऊन, खातरजमा करूनच ‘केवायसी’ कागदपत्रे द्या. स्वतः विवरणपत्र भरणार असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

(लेखक सीए आणि सायबर गुन्हेविषयक अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com