सर्वसामान्यांना मोठा फटका ! सिलेंडर पुन्हा हजार पार: LPG Cylinder Price | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

LPG Cylinder Price

LPG Cylinder Price: सर्वसामान्यांना मोठा फटका ! सिलेंडर पुन्हा हजार पार

महागाईने सर्वसामांन्यांचे कंबरडे मोडले आहे. अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत आणि पेट्रोल, डिझेलपासून ते खाद्य तेलापर्यंत सर्वच वस्तुंचे दर वाढले आहेत. आता महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. तो म्हणजे एलपीजी सिलिंडरचा. एलपीजी सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली आहे. तर व्यावसायिक सिलेंडरही महागला आहे. (LPG Cylinder Price)

महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. आता दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर 1103 रुपयांचा झाला आहे. होळीपूर्वी नागरिकांना तेल कंपन्यांनी मोठी झटका दिला आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

दिल्लीत आता 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 2119.50 रुपयांना मिळणार आहे. तर घरगुती एलपीजी सिलिंडर 1103 रुपयांचा झाला आहे. वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत.